दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते डॉ विनायकराव पाटील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उदघाटन सोहळा

दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते डॉ विनायकराव पाटील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उदघाटन सोहळा

देवणी (प्रतिनिधी) : देवणी येथील डॉ विनायकराव पाटील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उदघाटन सोहळा सहकार महर्षी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी व प्रमुख पाहुणे आबासाहेब पाटील, अशोकराव पाटील निलंगेकर, त्र्यबक भिसे , लक्ष्मणराव मोरे, श्रीशैल्य उटगे, अजित बेळकोणे, सौ. किर्तिताई घोरपडे, अमित मानकरी, जावेद तांबोळी, सौ. कुशावर्ताताई बेळे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, अशा छोट्याशा तालुक्यात करोडो रुपये खर्चून मोठ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व कॅन्सर सेंटर उभा करायला आपल्या जन्माभूमीचे आपण काहीतरी देणे आहोत, याची जाणीव असणारे डॉक्टर्सच हे करू शकतात, कॅन्सर हा खूपच जीवघेणा आजार आहे. ते समजल्यानंतर काही तासातच उपचार चालू करावा लागतो, यासाठी वेळ जाऊ नये. म्हणूनच त्यांनी आपल्यासाठी मुंबई सोडून येथे आलेत, ऍक्सिडेन्ट झाल्यानंतर किती लवकर उपचार लागतो व महिलांसाठी कोणती वेळ कधी रात्री बे रात्री येते, खेडेगावातील अशा सर्व गोष्टींची जाणीव असलेले डॉ विनायकराव पाटील यांनी या भागात हॉस्पिटल उभारण्याचे धाडस केले व आपल्या सर्व डॉक्टर्स परिवाराला डॉ अमित पाटील – कॅन्सर व प्लास्टिक सर्जन, डॉ. देवश्री पाटील – कॅन्सर सर्जन, डॉ. आशिष पाटील – ऑर्थोपेडिक सर्जन व डॉ. श्वेता पाटील – स्त्री रोग व प्रसूती शास्त्र तज्ञ यांना सोबत पैसा कमावणे हा उद्देश बाजूला ठेऊन आपल्यातील डॉक्टरकी पेशाला योग्य न्याय देण्यासाठी येथे आले आहेत. त्याबद्दल सर्व डॉक्टर्स यांचे खूप खूप अभिनंदन व कॅन्सर किती मोठा आजार आहे, आणि त्यासाठी कसे समोरे जायच त्याचे मी स्वतः ज्वलंत उदाहरण आहे. त्यासाठी फक्त आपल्यात आजारासोबत लढण्याची हिम्मत असली पाहिजे. व त्यासाठी वेळेवर उपचार घेण्याची गरज आहे, काही म्हणतात की, कॅन्सरवर ईलाज नाही. ते सर्व खोट आहे, जर तुम्ही डॉ अमित पाटील यांच्यासारख्या तज्ञ डॉक्टरांकडे आलात तर, तुम्ही पण माझ्यासारखे भाषण देऊ शकता, व निवडणूक लढवून मंत्री पण होऊ शकता. फक्त हिम्मत न हारता वेळेवर डॉक्टरांना भेटण्याचे आवाहन केले. ऐखादे कॅन्सरचे ऑपरेशन मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील मोठ्या हाॅस्पिटल मध्ये पाच लाख मध्ये होत असेल तर ते डाॅ विनायकराव पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये फक्त अडीच लाख रूपयात होते. ही सवलत सर्व स्तरावर महाराष्ट्र, कर्नाटक दोन्ही राज्याच्या पेशंटस साठी देत आहात. महाराष्ट्राच्या पेशंटस साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन एक लाख रुपये अनुदान व सिद्धिविनायक ट्रस्ट,मुंबई येथुन 25 हजार रु मिळऊन देऊन कॅन्सरच्या ऑपरेशनचा पाच लाख रुपयाचा खर्च प्रत्यकी फक्त एक लाख पंचवीस हजार ऐवढाच येतो, आणि इत्तर टेम्पल ट्रस्ट जसे शिर्डी साई देवस्थान ट्रस्ट कडून मदत निधी मिळऊन खर्च आणखी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहात, व इतर सर्व उपचारही अल्पदरात होतात त्यामुळे पुणे मुंबई न जाता त्याच दर्जाचे सर्व ऑपेरेशनस आता देवणीतच होत आहेत. याचा सर्व जनतेनी लाभ घेण्याचे आवाहन दिलीपराव देशमुख यांनी या उदघाटन समारंभावेळी केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भगवानराव पाटील विजयनगरकर यांनी मांडले तर सूत्र संचालन प्रा. मोटेराव यांनी केले. या समारंभस देवणी येथील सर्व मान्यवर व हॉस्पिटल चा सर्व स्टाफ उपस्थित होता.

About The Author

error: Content is protected !!