श्री.स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा बालसंस्कार मुख्य केंद्रात रक्तदान शिबिर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा संचलित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बाल संस्कार मुख्य केंद्र रामचंद्र नगर नांदेड रोड उदगीर या केंद्रात साक्षात परब्रम्ह स्वरूप गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व गुरुपुत्र दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.यावेळी राजू मुक्कावार, तालुका प्रमुख सचिन बामनपल्ले, सुनीता हंडरगुळे,निवृत्ती जवळे, राधाई ब्लड बँकेचे संचालक डॉ. विश्वनाथ डांगे,डॉ.तप्ती डांगे, सचिदेव शिरसाठ,स्वाती स्वामी,सुशील कुमार साबणे,अनिता खटके, सुलोचना साबळे, महेश भंगे, वीरेंद्र राठोड यांची यावेळी उपस्थिती होती.
