अखेर….. ! दोन वर्षानंतर शेंद्री (सुनेगाव) येथील फ्लोराईड युक्त पाण्याचा बोर सांडपाण्यासाठी चालु
लवकरच बंद असलेले फिल्टर चालु होणार गावाला मिळणार शुद्ध पाणी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुुक्यातील शेंद्री(सुनेगाव) येथे पिण्याच्या पाण्याचा एक बोअर असुन त्या बोअरचे पाणी फ्लोराईड युक्त असल्यामुळे जिल्हा परिषद मार्फत साधारणतहा दोन ते अडीच वर्षा पुर्वी लाखो रुपये खर्चुन गावात फिल्टर बसवले होते व ते फक्त नावापुरतेच सध्य स्थितीत सदरील फिल्टर पूर्णपणे बंद असुन धुळखात पडले असल्यामुळे गावातील लोकांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शुध्द पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे
याविषयी सविस्तर माहिती अशी की, शेंद्री (सुनेगाव) येथील फ्लोराईड युक्त पाणी शुद्ध करण्याचे फिल्टर गेली दोन वर्षा पासुन गावात बसवले आहे व ते पूर्ण पणे बंद आहे व धुळ खात पडले आहे बोअर मध्ये सुध्दा मोटार अडकल्यामुळे पाण्याचा बोर देखील बंद होता नुतन सरपंच उषा जायभाये यांनी आपल्या सरपंच पदाचा पदभार स्विकारताच अवघ्या दोन महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गावाची अडचण समजुन घेऊन नुतन सरपंचाचे भाया राम जायभाये यांनी संबंधीत यंत्रणेकडे पाठपुरावा करून बोर मधील अडकलेली मोटार काढुन त्या बोरमध्ये आज दि १८ एप्रिल रोजी नविन सोलार वर चालणारा पाण्यााचा पंप टाकुन तात्पुरती गावासाठी सांड पाण्याची व्यवस्था केली असुन लवकरच चार ते पाच दिवसात फ्लोराईड युक्त पाणी शुध्द करण्याचे फिल्डर चालु करून गावाला शुध्द पाणी पुरवठा करण्यात येणार आहे तसेच सुनेगाव व शेनी येथील शुध्द पाण्याचे फिल्टर देखील असेच धुळखात पडलेले असुन त्यामुळे दोन्ही गावांना बाहेर गावातुन पाणी विकत घ्यावे लागत आहे ते फिल्टर संबंधीत यंत्रणेकडे पाठपुरावा करून लवकरच चालु करण्यात येतील असे सरपंचाचे भाया तथा समाज सेवक राम जायभाये यांनी सांगितले.
यावेळी सदस्य राजु होळकर, गोपीनाथ जायभाये, पत्रकार गोविंद काळे , सोपान जायभाये, हनमंत थगनर,नरहरी थगनर,भरत काटे,ज्ञानदेव होळकर,गंगाधर थगनर,बाबु काटे, सुनिल काटे, शिवानंद काटे, योगानंद काटे, शंकर काटे, शिवराज थगनर, नारायण काटे, प्रल्हाद काटे, दयानंद काटे, दिपक होळकर, निवृत्ती होळकर, मनोहर होळकर, जनार्दन होळकर, सोनु थगनर आदिंची उपस्थिती होती.