सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरिक्षक शिवाजी तादलापुरकर यांनी दिले श्वानस जिवदान
अहमदपूर (गोविंद काळे) : सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरिक्षक शिवाजी केरबाजी तादलापुरकर यांनी मानेवर किडे पडलेल्या श्वानावर उपचार करुन त्यास जिवनदान दिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे तादलापुर येथील रहीवाशी असलेले व हल्ली जोगेश्वरी मुंबई येथे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरिक्षक शिवाजी केरबाजी तादलापुरकर यांनी मानेवर जखम होवून किडे झालेल्या व अंतिम अवस्थेत असलेल्या श्वानावर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करुन त्याला जिवनदान दिले आहे.
कोविड-19 सारख्या महारामारिच्या काळात वैद्यकिय सुविधा माणसाला मिळणे कठिण झाले आहे अश्या अवस्थेत तादलापुरकर साहेबांनी श्वान पथकाला सांगितले परंतु हा श्वान कोणाच्याही हाती आला नाही. शेवटी वैद्यकिय अधिकार्यांचा सल्ला घेतला त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की हा श्वान जास्तीत जास्त आठ ते दहा दिवस जगेल. हे ऐकल्यानंतर तादलापुरकर साहेबांनी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर जगण-मरण आपल्या हातात नाही परंतु या श्वानावर उपचार करणे आवश्यक आहे यासाठी त्यांनी डॉक्टरांकडून औषधी लिहुन घेतली. पाळलेल्या श्वानावर विलाज करणे सोपे होते परंतु बिल्डिंगच्या आवारात फिरणार्या कुत्र्यावर उपचार करायचा म्हणजे जिकरीचे काम होते.
त्या श्वानाची जखम एवढी चिढली होती की तो कोणासही जवळ येवू देत नव्हता, जवळ गेले तर चावेल अशी भिती होती. त्या श्वानास पकडून जखमेवर औषधी लावणे के कार्य अश्यकच होते. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अलमोक्स 500 ही कॅप्सुल दुधामधुन, अन्नामधुन दिले. जवळपास दोन ते तीन महिने सतत औषधी अन्नातुन त्या श्वानास दिल्यामुळे त्याची जखम बरी झाली आणि त्यास जिवदान मिळाले.
याकामी त्यांची पत्नी सौ. गंगासागर तादलापुरकर यांनी त्या श्वानासाठी लागणारे अन्न दिवसातून दोन-तिन वेळा तयार करुन देत गेली. घरातील सदस्य जेवण्या अगोदर त्या जखमी श्वानास अन्न देवूनच जेवण करायचे. तादलापुरकर परिवाराच्या वतीने अंत्यअवस्थेत असणार्या श्वानास जिवनदान मिळाले. याकामी प्रशांत तादलापुरकर, अविनाश तादलापुरकर, संदिप तादलापुरकर यांनीही वेळोवेळी मदत केली.