चंद्राई हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, उदगीर चे लोकार्पण

चंद्राई हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, उदगीर चे लोकार्पण

उदगीर (प्रतिनिधी) : येथील डॉ. सुधीर जगताप संचलित चंद्राई हॉस्पिटल अँड रीसर्च सेंटरचे लोकार्पण राज्यमंत्री श्री संजयजी बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. चन्द्राई हॉस्पिटल येथे अत्याधुनिक शंभर खाटां ची सुविधा उपलब्ध करण्यात आली  असून यात पंचवीस आय सी यु बेड, पाच वेंटीलेटर ची असे 30 तसेच 70 बेडच्या स्पेशल रूमची सुविधा करण्यात आली आहे. या लोकार्पण सोहळ्यास, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक डानियाल , उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ढगे, मुख्य कार्यकारी अधिकारी न.प. उदगीर भारत राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरिदास, ॲड. पद्माकर उगीले , प्राध्यापक श्याम डावळे,  संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर जगताप, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम हिबाने, राजू हांबल्पुरे, कार्यकारी अधिकारी यादव राजेश, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य गणेश तोलसरवाड, नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्या सौ. ज्योती एन. स्वामी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कोविड ची महामारी असताना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही नेहमीच जनसामान्यांच्या व शासनाच्या मदतीला नेहमी अग्रेसर असते. जयहिंद शाळेच्या इमारती मध्ये कोविड केअर सेंटर च्या माध्यमातून कोरोना ग्रस्तांसाठी सेवा व सुविधा उपलब्ध केल्याबद्दल शासनाने संस्थेस सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.  ते कार्य आजही विनाखंडीत चालू आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीरजी जगताप यांनी समाजसेवेचे वृत्त म्हणून चंद्राई हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर च्या माध्यमातून रुग्णांची सेवा करण्याचे वृत्त हाती घेतले आहे. यामुळे कोवीड काळात रुग्णांचे होणारे हाल अपेष्टा काही प्रमाणात का होईना कमी करण्याचे धाडस डॉ. सुधीर जगताप यांनी केले आहे. चन्द्राई हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील अत्याधुनिक सोयी सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

About The Author