“कर्म हाच स्वर्ग “महात्मा बसवेश्वरांचे विचार आत्मसात करू या – आनंद चोबळे

"कर्म हाच स्वर्ग "महात्मा बसवेश्वरांचे विचार आत्मसात करू या - आनंद चोबळे

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूलमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस श्यामलाल मेमोरियल हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.” कायक वै कैलास ” म्हणजेच आपले चांगले कर्म, कर्तव्य हाच स्वर्ग आहे, आपण सर्वांनी चांगले कर्म करून आपला समाज, आपला देश यांचा जास्तीत जास्त विकास व समृद्धी कशी होईल? यासाठी प्रयत्न करावेत, असे मत भाषणात व्यक्त केले. सर्वांना महात्मा बसेवश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी सर्वांना शुभेच्छा संदेश दिला. महात्मा बसवेश्वर यांच्या समाजसुधारनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सर्वांनी कार्य करावे, असा संदेश दिला.याप्रसंगी महात्मा बसेवश्वर यांच्या प्रतिमेस उमाकांत सूर्यवंशी, शरद पाटील, बस्वराज स्वामी, सुभाष जाधव यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

About The Author

error: Content is protected !!