बसवेश्वरांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिलेला मूलमंत्र – कायकवै कैलास : प्रा.डॉ. वनिता आग्रे

बसवेश्वरांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिलेला मूलमंत्र - कायकवै कैलास : प्रा.डॉ. वनिता आग्रे

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी यांच्या संकल्पनेतून महापुरुषांची जयंती साजरी केली जाते . त्या निमित्त आज दि. 22 एप्रील 2023 रोजी जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 918 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . या प्रसंगी महाविद्यालयात हिंदी विभागात कार्यरत असलेल्या प्रा . डॉ. वनिता आग्रे यांनी महात्मा बसवेश्वरांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कायकवै कैलास हा मूलमंत्र दिला आणि हाच मूलमंत्र समस्त भारतीयांनी स्वीकारण्याची गरज आहे असे उद्गार काढले . या प्रसंगी त्यांनी बसवेश्वरांनी समाजाला जातीभेद , वर्णभेद , विषमता , अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी जी चळवळ सुरु केली त्या शरण चळवळीचा आढावा घेतला . या चळवळीत अग्रजा पासून अंत्यजा पर्यंत त्यांनी समाविष्ट केले . या मागे त्यांचा समानता , मानवता , बंधुता हा उद्देश्य होता . त्यांनी त्यांच्या वचनांच्या माध्यमातून स्त्रियांना समान हक्क , स्वबळावर जगणे , पशुहत्या न करणे , पर्यावरण रक्षण करणे , दगडधोंडे न पूजणे , नैतिकता बाळगणे , सदाचारी बनणे , भूकेल्याला अन्न देणे , नेहमी दासोह करणे अशा अनेक शिकवणी देऊन त्या लोकांच्या आचरणातच नव्हे तर संपूर्ण विश्वात त्यांनी रुजवल्या . एकांताकडून लोकांताकडे , ऐतखाऊ वृत्तिकडून कायकवादाकडे , देवालयाकडून देहालयाकडे , विषमतेकडून समतेकडे , कपोलकल्पित ग्रंथाकडून अनुभव ग्रंथाकडे , शिवलिंगाकडून इष्टलिंगाकडे घेऊन जाणारी नवी समाजव्यवस्था निर्माण करणारे 12 व्या शतकातील महात्मा बसवेश्वर नवे पथदर्शी होते.असे विचार मांडले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड, ,उपप्राचार्य अनिलकुमार माळी, कार्यालयीन अधिक्षक रूपचंद कुरे, डॉ. प्रदीप सूर्यवंशी , डॉ . रामेश्वर खंदारे , डॉ. नीतिन डोके , डॉ. मच्छिंद्र खंडागळे , प्रा. शैलेश सुर्यवंशी , प्रा.डॉ . सुधीर गाढवे , प्रा . दशरथ ननवरे , डॉ. मीना घुमे , डॉ. अश्लेषा बिरादार श्री. दीपक ढोले , प्रा . नितेश दूधभाते यांच्यासह प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author