राज्यासह देशात असलेला लातूर बाजार समितीचा लौकिक टिकविणे व वाढविणे यासाठी प्रयत्नरत राहणार – माजी मंत्री आ.अमित देशमुख
माजी मंत्री आ.अमित देशमुख यांनी मार्केट यार्डातील आडते, व्यापारी, हमाल, मापाडी मतदार बांधवांशी साधला सुसंवाद
लातूर (प्रतिनिधी) : राज्यात आणि संपूर्ण देशात लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक लौकिक आहे,येथील व्यापार आणि व्यापाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करून हा लौकिक टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न आजवर केला आहे. भविष्यातही ते सुरूच राहिल असे म्हणत देशमुख कुटुंबीयांचे लातूर बाजार समिती सोबत असलेले जिव्हाळ्याचे नाते देखील कायमपणाने जपले जाईल अशी ग्वाही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांनी दिली. कृषी विकास पॅनल लातूरच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी आयोजित संवाद बैठकीत आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते.
लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२३ ची रणधुमाळी सुरु झाली असून या निवडणुकीतील कृषी विकास पॅनलच्या प्रचारासाठीची शुभारंभाची बैठक शुक्रवार दिनांक २१ एप्रिल रोजी सायंकाळी मार्केट यार्ड मधील आडत व्यापारी अशोक (गट्टू सेठ) अग्रवाल यांच्या दुकानात पार पडली यावेळी व्यापारी,आडते,हमाल,मापाडी यांच्याशी राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी संवाद साधला आणि निवडणुकीबाबत चर्चा केली.
यावेळी बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले कि, राज्यात आणि संपूर्ण देशात लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक लौकिक आहे,येथील व्यापार आणि व्यापाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करून हा लौकिक टिकविण्याचा आणि वाढविण्याचा प्रयत्न आजवर केला आहे. भविष्यातही तो सुरूच राहिल असे म्हणत देशमुख कुटुंबीयांचे या मार्केट यार्ड सोबत असलेले जिव्हाळ्याचे नाते देखील कायम जपले जाईल. तसेच विद्यमान मार्केट यार्डात अद्यायावत सोयी सुविधा उभारून पुनर्विकास करण्यात येईल.एम.आय.डी.सी.परिसरात आंतरराष्ट्रीय बाजार पेठ उभारण्याच्या प्रक्रियेतील सर्व आडथळे आता दूर झाले असून या कामाला लवकरच गती येणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्यासाठी फळे,फुले,भाजीपाला निर्यातीसाठीच्या व्यवस्थाहि उभारण्यात येणार आहेत.
पुढे बोलताना आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले कि, लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२३ करिता कृषी विकास पॅनलच्या माध्यमातून आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आज प्रचाराच्या शुभारंभाची बैठक संपन्न होत आहे. देशमुख व अग्रवाल कुटुंबीय यांचे पिढ्यानपिढ्याचे नाते आहे. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर व देशमुख परिवार हे जे नाते निर्माण झाले आहे हे नातं जोपासण्याचे काम आपणाला येथे करायचे आहे. लातूर शहर व जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र म्हणजे ही बाजारपेठ आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यातील पहिली व राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे याचे सर्व श्रेय आपल्या सर्वांना जाते. या निवडणुकीत आपला आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. व्यापारी व हमाल मापाडी मतदारसंघात तील व्यक्तींनी चांगले काम केले आहे. या बाजारात रस्ता, नाली, दिवाबत्ती, स्वच्छतागृह, कचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी यांना प्राथमिकता देत जी राहिलेली कामे आहेत ती आंतरराष्ट्रीय दर्जाची केली जातील असेही त्यांनी सांगितले.
लातूर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना चांगले काम करण्यास आम्ही स्वातंत्र्य दिले आहे. नुकतेच प्रसिद्ध केलेल्या कृषी विकास पॅनलच्या जाहीरनाम्यात जो शब्द दिला आहे तो आम्ही पाळणारच आहोत. आज कृषी विकास पॅनलला नंदीबैल हे चिन्ह निवडणूक आयोगाने वितरित केले आहे. हे चिन्ह शुभ आहे महादेवाचे वाहन नंदी आहे नंदीचे दर्शन आपण घेतले पूजन देखील केले आणि आता हे चिन्ह घेऊन आपणाला मतदारासमोर जायचे आहे.
मागील काही दिवसात विरोधक टीका करीत आहेत अशा विरोधकांच्या टिकेकडे आपण लक्ष देण्याची गरज नाही. सोसायटी व ग्रामपंचायत येथील आपले उमेदवार अनुभवी आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांचा आशीर्वाद आपल्या कृषी विकास पॅनलला आहे. त्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्य घेऊन आपल्या कृषी विकास पॅनलचे उमेदवार निवडून येतील यात शंका नाही. व्यापारी मतदारसंघात स्वकीयांचेच आव्हान असून नाराजांना सोबत घेऊन आपण काम करावे असे म्हणत आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली.
एक नवीन सुरुवात आपल्याला करायची आहे आजघडीला या बाजाराची तीन कोटीची उलाढाल आहे ती येणाऱ्या काळात सहा कोटीपर्यंत कशी जाईल यासाठी प्रयत्न करावे लागतील.लातूर बाजार समितीत काम करणाऱ्या महिला कामगारांच्या प्रश्नाकडे आपण लक्ष दिले पाहिजे. याकरिता महिलांसाठी एक वेगळी बैठक कृषी विकास पॅनेलच्या माध्यमातून घेण्यात येईल असे सांगत लातूर बाजार समिती निवडणूक २०२३ करिता कृषी विकास पॅनलला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे माजी मंत्र आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आभार मानले.
याप्रसंगी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललीतभाई शहा, माजी उपसभापती मनोज पाटील, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲङ. किरण जाधव, कृषी विकास पॅनल लातूरचे अधिकृत उमेदवार व्यापारी मतदारसंघातील बालाप्रसाद बीदादा, सुधीर गोजमगुंडे, हमाल मापाडी मतदारसंघातील अधिकृत उमेदवार शिवाजी कांबळे तसेच कृषी विकास पॅनलचे सर्व अधिकृत उमेदवार, यांच्यासह चेअरमन गणपतराव बाजूलगे, हुकुमचंद्र कलंत्री, अभय साळुंखे, लक्ष्मण कांबळे, विद्याताई पाटील, चंदू पाटील, सचिन पाटील,प्रकाश लोया,आनंद कासट, सचिन बंडापल्ले, रविशंकर जाधव, प्रवीण सूर्यवंशी, प्रा. प्रवीण कांबळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, माजी महापौर प्रा. स्मिता खानापुरे, रेणा साखरचे माजी व्हा. चेअरमन आबासाहेब पाटील, धनंजय देशमुख, राजकुमार पाटील, विलास को-ऑप. बँकेचे उपाध्यक्ष ॲङ.समद पटेल, ट्वेन्टीवन शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, विलास साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, माजी व्हा. चेअरमन गोविंद बोराडे, तात्यासाहेब देशमुख, अशोक काळे, मदन भिसे, डॉ.सतिष कानडे, सुदाम रुकमे, रावसाहेब लकडे, माजी सभापती वाल्मिक माडे, केदार अग्रवाल, प्रणव अग्रवाल, लालासाहेब देशमुख यांच्यासह बाजार समितीचे माजी संचालक, तसेच माजी पदाधिकारी कृषी विकास पॅनल लातूरचे सर्व उमेदवार बाजार समिती मधील आडते, व्यापारी, हमाल, मापाडी,(तोलारी), गाडीवान, गुमास्ते, महिला कामगार यांच्यासह सर्व घटक, शेतकरी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक (गट्टू सेठ) अग्रवाल यांनी केले तर व्यापारी मतदारसंघातील अधिकृत उमेदवार बालाप्रसाद बीदादा व सुधीर गोजमगुंडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश सूर्यवंशी यांनी तर शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार आशिष अग्रवाल यांनी मानले