कृ.उ.बाजार समिती निवडणुकीत भा.ज.पा. ने धनगर समाजातील उमेदवार डावल्याची चर्चा !
अहमदपुर ( गोविंद काळे ) तालुक्यात सध्या कृषी उत्पन्न बाजारा समिती निवडणूक रंगात आली असून सर्वच नेते ,उमेदवार आपली ताकद अजमावत आहेत.सर्व राजकीय,समाजिक,जातीय समीकरणाची गोळा बेरीज चालु आहे.त्या मध्ये तालुक्यात बहुसंघ्य असलेला धनगर समाज हा भारतीय जनता पार्टी सोबत असल्याचे अनेक निवडणुकीतील निकालाच्या माध्यमातून लक्षात येते.पण सध्या भा.ज.पा.ने जाणीव पूर्वक धनगर समाजातील कार्यकार्यत्यांना उमेदवारी दिली नाही एका उमेदवाराला उमेदवारी दिली तो व्यक्ती सुशिक्षित नाही त्यांचा तितकासा राजकीय वावर नाही अस त्यांच्या समाजातील लोकांचं मत आहे.भा.ज.प.ने या निवडणुकीत मराठा-6,वंजारी-3,रेड्डी-3,लिंगायत -2 तर बहुसंख्य असलेल्या धनगर समाजाचा एक उमेदवार देऊन धनगर समाजावर अन्याय केल्याच बोललं जात आहे .अशी जातीनिहाय उमेदवारी दिली इतर समाजापेक्षा धनगर समाजाचे लोकप्रतिनिधी सदस्य तालुक्यात जास्त असताना उमेदवारी जास्त मिळायला हवी होती पण तास काही घडलं नाही अशी समाजात चर्चा आहे.तर राष्ट्रवादीने धनगर समाजाचे 2-3 उमेदवार रिंगणात उतरवत समाजाच्या ताकदीला न्याय दिल्याचे बोलले जात आहे. समाजातील चांगले उमेदवार जाणीवपूर्वक डावलून कमकुवत व्यक्तीला उमेदवारी देऊन समाजाची राजकीय ताकद कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असून येणाऱ्या काळात भा.ज.पा.ला धनगर समाजाच्या रोषाला सामोर जावं लागेल अशी चर्चा सुरु आहे.