विचित्र घटनेत पोकलेनचा स्फोट; हवेत उडालेले स्पेयर पार्ट लागून दोन ठार

विचित्र घटनेत पोकलेनचा स्फोट; हवेत उडालेले स्पेयर पार्ट लागून दोन ठार

अहमदपूर (गोविंद काळे ) : तालुक्यातील देवकरा गावाच्या शिवारात रात्री विचित्र घटना घडली आहे. या गावातील प्रभाकर मुरकुटे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम चालू होत. यासाठी पोकलेन काम जलद गतीने करावे असा त्याचा विचार होता. यासाठी बाजूच्या कोळवाडी येथील दहिफळे यांनी मध्यस्ती करत भाड्याने पोकलेन आणला होता. रात्री साडे आठ वाजता ठिकाणी काम सुरू करतानाच अपघात झाला …पोकलेनचा स्फोट झाला….त्याचे सर्व लोखंडी सामान आणि त्याचे स्पेयर पार्ट हवेत उडाले हे उडालेले भाग बाजूलाच उभे असलेले प्रभाकर मुरकूटे आणि दहिफळे यांच्या अंगावर पडले …यात या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोकलेन ला आग लागली होती …मोठा आवाज ऐकून लोक घटनास्थळी धावले …घटनेची माहिती किणगाव पोलीस ठाण्यास मिळताच तात्काळ अहमदपूर येथून अग्निशमन दलाच्या गाडीस पाचारन करण्यात आले …आगीवर नियंत्रण मिळविन्याय यश आले आहे …पोकलेन मध्ये डिझेल असल्यामुळे आग उशिरा आटोक्याय आली आहे …पोकलेन चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर प्रथमउपचार केल्यानंतर त्यास अंबाजोगाई येथील दवाखानायत पाठविण्यात आले आहे …पोकलेन चा स्फोट विजेच्या तारेला पोकलेन स्पर्श केल्यामुळे झाला आहे असे बोलले जात आहे मात्र घटना नेमकी काय आहे याची आम्ही माहिती घेत आहोत …या घटनेतील तीन व्यक्ती पैकी दोन जणचा जीव गेला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे…आताच घटना कशी घडली हे सांगता येणार नाही …चौकशी चालू आहे अशी माहिती किणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी शैलेश बंकवाड यांनी दिली आहे…
       ही घटना नेमकी कश्यामुळे घडली पोकलेन सारखे वाहनाचे पार्ट हवेत उडून कसे गेले…या बाबत सध्या अनेक तर्क लावले जात आहेत …याचे चित्र पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल …आवाज मोठा आल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्यासंख्येने घटनास्थळावर आले होते …दोन्ही मृतदेह पोस्टमार्टेम साठी पाठविण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती

About The Author