महात्मा फुले महाविद्यालयात महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी

अहमदपूर, ( गोविंद काळे)
येथील महात्मा फुले महाविद्यालयात समतेचे पुरस्कर्ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठी विभागातील प्रोफेसर तथा ह.भ.प. डॉ.अनिल मुंढे हे होते तर ; रवींद्रनाथ टागोर माध्यमिक विद्यालयातील शिक्षक माधव मुरमुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले तर, आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी डॉ. पांडुरंग चिलगर, अजय मुरमुरे, वामन मलकापूरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!