अल्पावधीतच कीर्तनकार म्हणुन नावारुपाला आलेले श्री, ह,भ,प,भागवताचार्य, दिलीप महाराज मुसळे मोळवणकर

अल्पावधीतच कीर्तनकार म्हणुन नावारुपाला आलेले श्री, ह,भ,प,भागवताचार्य, दिलीप महाराज मुसळे मोळवणकर

किनगांव ( गोविंद काळे ) सध्याच्या या किर्तन क्षेत्रात कमी कालावधीत फार मोठ्या किर्तनकारांच्या यादीत नाव आले व उत्तुंग भरारी घेतलेले किनगांव परिसरातील तरुण तडफदार युवाकिर्तनकार,ह,भ,प,भागवताचार्य दिलीप महाराज मुसळे मोळवणकर यांनी महाराष्ट्रात नव्हे तर आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यातही किर्तन कथा करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे त्यांची किर्तने मोठ्या उत्सवातही जेथे रामायणाचार्य,ढोक महाराज, व निव्रती महाराज देशमुख इंदोरीकर अश्या किर्तनकारांची ज्या उत्सवात किर्तने होतात त्याच उत्सवात दिलीप महाराजांना सुध्दा सप्ताह कमिटी पाचारण करित आहे महाराजांची किर्तन करण्याची पध्दत सोपी साधी सरळ असल्याने त्यांच्या किर्तनाला श्रोत्यांची फार मोठी गर्दी जमलेली असते त्यात तरुणांची संख्या खुप मोठी असते महाराजांचे प्रबोधन जास्त प्रमाणात तरुण मुलांमध्ये व्यसनाधीनता,आईवडील, हुंडाबंधी,गोहत्या, या विषयी किर्तनातुन प्रबोधन करत असल्यामुळे त्यांच्या किर्तनात तरुणांची संख्या अधिक असते तसे पहाता महाराजांचा जन्म डोंगरभागात एका सर्वसामान्य शेतकर्याच्या कुटुंबात झाला पण लहानपणापासून पारमार्थिक आवड असल्याने महाराजांच अगोदर म्रदंग क्षेत्रात सुध्दा महाराष्ट्रात नाव गाजलेल होतं आणि आता किर्तन क्षेत्रात राज्यातच नव्हे तर राज्याच्या बाहेरही त्यांच्या किर्तनसेवा होतात,असे नवीन व्यक्तिमत्त्व नावारुपाला आल्याची परिसरातच नव्हे तर वारकरी संप्रदायात सर्वदुर चर्चा होत आहे महाराजांचा या वर्षी किर्तनसेवेचा रौप्य महोत्सव सोहळ्याचे सुध्दा आयोजन त्यांच्या चाहत्या वर्गाने केले आहे तो महोत्सव दि 20मे 27मे या कालावधीत होणार आहे असे महाराजांनी बोलत असताना सांगितले आहे

About The Author