तरुणांनी श्रमाला महत्व दिल्यास जीवनात क्रांती होते.महात्मा बसवेश्वर पुरस्कार विजेते राम तत्तापुरे यांचे प्रतिपादन.

तरुणांनी श्रमाला महत्व दिल्यास जीवनात क्रांती होते.महात्मा बसवेश्वर पुरस्कार विजेते राम तत्तापुरे यांचे प्रतिपादन.
 अहमदपूर ( गोविंद काळे) जगत ज्योती महात्मा बसवेश्वर हे समतेचे नायक असून त्यांनी बाराव्या शतकात सर्व धर्म समभाव रुजविण्याचा आणि श्रमाला प्रतिष्ठा निर्माण करून दिली त्यामुळे तरुणांनी श्रमाला महत्त्व देऊन आपल्या जीवनात विकासाची क्रांती करावी असे जाहीर आवाहन महात्मा बसवेश्वर समता शिवा पुरस्कार विजेते राम तत्तापूरे यांनी केले.ते येथील यशवंत विद्यालयात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात  प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. व्ही. गंपले हे होते. 
 यावेळी उप मुख्याध्यापक उमाकांत नरडेले, पर्यवेक्षक दिलीप गुळवे, गजानन शिंदे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होते. सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य व्ही. व्ही. गंपले यांनी  केला.

प्रास्ताविक कपिल बिराजदार यांनी सूत्रसंचालन गुरप्पा बावगे यांनी तर आभार गहिनीनाथ क्षिरसागर यांनी मांनले. या सोहळ्याला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बसव प्रेमी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author