संत ज्ञानेश्वर विद्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी

संत ज्ञानेश्वर विद्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी

अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जगत ज्योती,विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्ताने श्री गणेश शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा एडवोकेट मानसी हाके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शिवालिका हाके, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मीना तोवर, संगीता आबंदे,अयोध्या जाधव, ज्ञानेश्वर चव्हाण, सतीश साबणे, युवराज मोरे,भास्कर दिंडे, पद्माकर नळगिरे, उमेश फुलारी, संजय कज्जेवाड, अनंत उदगिरे, विवेकानंद सुरनर सह विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जगातल्या पहिल्या लोकसंसदेचे निर्माते, जातीभेद दूर करून मानवता हाच एक धर्म असा जगाला समतेचा संदेश देणारे समता नायक, विश्वगुरू महात्मा बसवन्ना यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता आबंदे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी तर आभार मीना तोवर यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!