जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने साजरी
उदगीर(एल.पी.उगीले) : प्रहार पक्षाच्या वतीने जनकल्याणकारी कार्य आपल्या हातून घडो या संकल्पानुसार जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त एक वही एक पेन देवून साजरी करण्यात आली. प्रहारनी हा कार्यक्रम समता नगर,विठृल मंदिर येथे संपन्न केली. या प्रसंगी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी दिनकर स्वामी तर प्रमुख पाहुणे म्हणून पी.पी.पाटील, उपजिल्हाप्रमुख विनोद तेलंगे,उदगीर तालुकाप्रमुख रविकिरण बेळकुंदे ,तालुका उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे,शहर कार्याध्यक्ष गणेश दावणे, सचिव बालाजी बिरादार, ता.सचिव अविनाश शिंदे, तालुका संघटक सोपान राजे, संगमेश्र्वर काळगापुरे, अविनाश जाधव ,ब्रिजेश जिवणे,विजु झेंरकुटे, हैबतपुरे,कलप्पा स्वामी,किशोर स्वामी, संतोष बिरादार, महेश स्वामी,नागेश पटवारी, बस्वराज स्वामी, उद्धव चामवाड,दिपक बिरादार, सचिन बिरादार सह समता नगर येथील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.