संस्कार भारती च्या वतीने भुअलंकरण दिवस साजरा

संस्कार भारती च्या वतीने भुअलंकरण दिवस साजरा

उदगीर(प्रतिनिधी) : येथील संस्कार भारतीच्या वतीने अक्षय तृतीयेच्या दिनी भुअलंकरण दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने निडेबन रोडवरील ‘चिन्मय व्यंकटेश मंदिरा’त रांगोळी काढण्यात आली.

यावेळी संध्या वट्टमवार, संध्या पत्तेवार, डॉ. अनुजा सताळकर, डॉ. दिपाली कुलकर्णी यांनी संस्कार भारतीने या वर्षाकरीता ठरवलेली रांगोळी मंदिरात प्रत्यक्षात साकारली. आज सकाळपासूनच अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मंदिरात होणाऱ्या भावीकांच्या गर्दीचा विचार करून, 21 एप्रिल रोजी दुपारीच ही भव्य रांगोळी साकारण्यात आली. यावेळी सुरेखा भेंडे, प्रदिप पत्तेवार, सावन टांकसाळे, अरविंद सुर्यवंशी, डॉ. संजय कुलकर्णी व संस्कार भारती समिती, उदगीरचे सदस्य उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!