पगारीसाठी वैतागलेल्या कर्मचाऱ्यांने केले विष प्राशन!ग्राम सेवकांच्या मनमानीला कर्मचारी वैतागले?

पगारीसाठी वैतागलेल्या कर्मचाऱ्यांने केले विष प्राशन!ग्राम सेवकांच्या मनमानीला कर्मचारी वैतागले?

उदगीर (संदीप पाटील) : उदगीर तालुक्यातील तोंडार ग्राम पंचायत ही १३ सदस्य व जनसामान्यांतुन निवडलेले सरपंच अशा 14सदस्यीय पंचायत आहे, परंतु गत 14 महिन्यांपासून पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्राम सेवक पगार देत नसल्याने आपला जिव धोक्यात घालून विष प्राशन करण्याची वेळ तोंडार ग्राम पंचायत पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आली आहे.रात्री बेरात्री गावापासून साधारण 3 किमी अंतर पार करून शेताशेताने गावची तहाण भागवण्यासाठी चालत जावे लागते, त्यातुनच आपल्या कुटुंबाची खळगी भरण्यासाठी प्रयत्न हे कर्मचारी करतात, परंतु ग्राम सेवक हे केलेल्या नौकरीची पगार देत नसल्याने लिपीक, साफसफाई करणाऱ्या महिला, कोतवाल, व पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आज पगारी साठी पाय खोरावे लागत असल्याने, ग्राम पंचायतचां पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांने चक्क ग्राम सेवकांच्या नावाने विष प्राशन करण्याची हिम्मत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, वास्तविक पाहता तोंडारचे ग्राम सेवक यु के मुंडे, हे असुन खोळबां अन् नसुन…! अशी अवस्था झाली आहे, ना बोलेना ना चालेना; या मुळे गावातील विकासकामे, स्वच्छता अभियान, नाली सफाई, पाणी शुद्धीकरण करणारी यंत्रणा यावर कोणाचे अंकुश नसल्याने, आंधळं दळतंय, अन् कुत्र पिठ खातंय, अशी अवस्था झाली आहे, यामागे मुख्य कारण म्हणजे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देत नसल्याने हे कर्मचारी कामचुकारपणा करत आहेत, परंतु दि:21/04/23रोजी एका कर्मचाऱ्याने ग्राम सेवक पगार देत नसल्याने चक्क जिवण संपवण्याचा प्रयत्न केला होता, ग्रामस्थांचा सावधानी मुळे तात्काळ उदगीर येथील कोमल हॉस्पिटलमध्ये उपचार करून स्वगृही आणले, जर काम करुन पगार देत नसतील तर चाकरी का करायची?व काम केलेले पगार देण्यासाठी ग्राम सेवकास काय अडचण आहे? हा ही मुद्दा समोर येत आहे, परवाच डिसेंबर महिन्यात निवडणुकीत नवीन सरपंच, उपसरपंच, सदस्य जनतेनी निवडणून दिलं आहेत, मात्र ग्राम सेवकांच्या हलगर्जीपणा मुळे या सर्व पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे , जर या कर्मचाऱ्यांच्या जिवितास काही धोका झाला असता तर यास कोण जबाबदार होते ? हा ही विषय समोर आला असता. या कुचकामी ग्राम सेवकांच्या हलगर्जीपणा मुळे विकासावर परिणाम होत तर आहेच, शिवाय अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी ही आहेत, यावर वरिष्ठ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author