जिल्ह्यात 1431 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

जिल्ह्यात 1431 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

नवीन 1477 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 41052 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1477 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

लातूर जिल्ह्यात 805 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 343 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच प्रलंबित मधील 7 कोरणा बाधित रुग्ण आढळून आले आहेत . 3560 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 1127 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 58240 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 16200 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 988 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 41052 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1431 आहे.

About The Author