वाहनांसह २६ लाखांची दारू जप्त; चौघांना अटक

वाहनांसह २६ लाखांची दारू जप्त; चौघांना अटक

किनगाव पोलिसांची कारवाई

किनगाव ( गोविंद काळे ) : अवैद्य दारूची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांसह तब्ल २६ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून , सदरची कारवाई अहमदपूर तालुक्यातील मानखेड पाटी येथे करण्यात आली . यावेळी चौघांना अटक केली असून , अन्य दोघे फरार आहेत . याबाबत किनगाव पोलिसात सहा जणांवर गुन्हा नोंद आहे . पोलिसांनी सांगितले , अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांची गुरुवारी गस्त सुरू होती . दरम्यान , दोन वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर दारूची वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली . या माहितीच्या आधारे अहमदपूर ते किनगाव महामार्गावरील मानखेड पाटी येथे संशयित असलेली दोन चारचाकी वाहने पोलिसांनी अडविली . यावेळी सदर वाहनांची झडती घेतली असता , एक वाहन क्रमांक पी.वाय . ०५ के ०१७८ मध्ये ४० खोक्यात देशी दारूच्या १ हजार ९ २० बॉटल्स आढळून आल्या . तर दुसऱ्या एका वाहन क्रमांक एम.एच. ४४/५१२३ मध्ये ५० खोक्यात देशी दारूच्या २ हजार ४०० बॉटल्स आढळून आल्या . याप्रकरणी सोमनाथ अशोक फड , सचिन रमेश पुजारी , शंकर ज्ञानोबा फड , परमेश्वर राघू पांचाळ सर्व रा.धर्मापुरी ता.परळी वैजनाथ , मानाजी रुक्षराज भताने रा . भतानवाडी ता . अंबाजोगाई आणि पांडुरंगमाणिक चाटे रा . खापरटोंग ता . अंबाजोगाई आदी सहा जणांपैकी चार जणांना अटक करण्यात आली . तर दोघे जण पळून जाण्यात यशस्वी ठरले . याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक एस.जी. बंकवाड , पोलीस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे , पोलीस नाईक व्ही . के . महाके , चालक माधव दहिफळे , पोलीस हवालदार शिवाजी टोपरपे , नागनाथ कातळे , होमगार्ड नाथराव मुंडे यांच्या पथकाने केली .

About The Author