आमदार बाबासाहेब पाटील यांच्या फंडातुन 10 रुग्णवाहिका लोकसेवेसाठी सज्ज

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या फंडातुन 10 रुग्णवाहिका लोकसेवेसाठी सज्ज

अहमदपूर ( गोविंद काळे ) : मतदारसंघातील गंभीर रुग्णांना चाकूर तसेच लातूर या ठिकाणी नेण्यासाठी आमदार निधीतून 10 रुग्णवाहिका मंजुर केल्या होत्या. आज त्या रुग्णवाहिकेंचे लोकार्पण झाले. या रुग्णवाहिका अहमदपूर तालुका ग्रामीण रुग्णालय, चाकूर तालुका ग्रामीण रुग्णालय आणि शिरूर ताजबंद, हडोळती, किनगाव, अंधोरी, सताळा, जानवळ, चापोली, नळेगाव या ठिकाणी असणाऱ्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अतिशय जलदगतीने हा निर्णय घेतला. या निर्णयाचे समाजमनातून स्वागत होत आहे. गरजू रुग्णांना प्राण वाचवण्यासाठी आवश्यक त्या सेवा वेळेत मिळण्यासाठी या सुविधेचा खूप फायदा होणार आहे.

यावेळी उपजिल्हाधिकारी प्रमोद जी कुदळे, चाकूर तहसीलदार शिवानंद जी बिडवे, अहमदपूर तहसीलदार प्रसाद जी कुलकर्णी, युवा नेते सुरज पाटील, चाकूर वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चनाताई पंडगे मॅडम, डॉ.नरवटे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, माजी सभापती करीमसाहेब गुळवे, काँग्रेस तालुकध्यक्ष विलासराव पाटील, गंगाधर केराळे, शिवसेना माजी तालुकाध्यक्ष अंगद पवार, तालुकाध्यक्ष गुणवंत पाटील, नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, नगरसेवक इलियास सय्यदजी, स्वीय सहाय्यक कोंडीबा पडोळे, चाकूर पंचायत समितीचे सदस्य हरिभाऊ काळे, युवक जिल्हा कार्यध्यक्ष प्रशांत भोसले, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बेडदे, पत्रकार अनिलजी वाडकर, पत्रकार गणेश स्वामी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समाधान जाधव, चाकूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष बिलाल पठाण, पत्रकार सलीम तांबोळीजी, राष्ट्रवादी किसान सभेचे तालुकाध्यक्ष रामदास घुमे आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!