राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत 12 लाभार्थ्याना धनादेशाचे वाटप
अहमदपूर महसुल विभागाचा स्तुत्य उपक्रम
अहमदपूर( गोविंद काळे ) : तालुक्यातील राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत विविध गावातील 12 लाभार्थ्याना आमदार बाबासाहेब पाटील यांच्या कल्पना सुचनेनुसार धनादेशाचे वाटप करण्यात आले, कोरोना संसर्ग रोगाच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील परिस्थिती बिकट होत चालली असून शहरात तसेच ग्रामीण भागात रुग्ण संख्येत दररोज वाढ होत आहे,यावर मात करण्यासाठी महसूल विभागाकडून विविध प्रकारचे नियोजन करण्यात येत असून ,रुग्णांची गैरसोय होऊ म्हणून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत, याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजने अंतर्गत लाभार्थ्यांना त्याच्या गावात जाऊन प्रत्येकी , 20,000 ,विस हजार रुपये प्रमाणे 12 लाभार्थ्यांना 2,40,000 रूपयेचे धनादेश वाटप करण्यात आले, यामुळे दलालांची साखळी तुटली असल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत होते सर्व लाभार्थ्यांच्या वतीने आमदार तसेच अधिकारी यांंचे आभार मानण्यात आले
मौजे.लिंगदाळ येथील लाभार्थी सत्यभामा मनोहर वाघमारे या लाभार्थ्यांस राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत धनादेश वाटप करताना प्रमोद कुदळे उपविभागीय अधिकारी, प्रसाद कुलकर्णी तहसीलदार अहमदपुर ,बबीता आळंदे नायब तहसीलदार, केंद्रे मँडम अ.का.शाम कुलकर्णी तलाठी उपस्थिती होती