अवैध हातभट्टी दारुवर छापा; 2 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त

अवैध हातभट्टी दारुवर छापा; 2 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा व गातेगाव पोलीस यांची संयुक्त कारवाई

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारू ची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर ग्रामीण प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे व गातेगाव पोलीस यांच्या नेतृत्वाखाली लातूर तालुक्यातील गातेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या मौजे काडगावतांडा येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे 5 इसमावर स्थानिक गुन्हे शाख्येच्या पथकाने छापेमारी केली. यामध्ये 4600 लिटर रसायन किंमत 2 लाख 35 हजार रुपये चे रसायन आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नष्ट करण्यात आले आहे. या कार्यवाहीत किशन बाबू चव्हाण (रा. काटगावतांडा), अशोक पांडुरंग चव्हाण (रा. काटगावतांडा), विश्वनाथ नामदेव चव्हाण (रा.काटगावतांडा), सुखदेव हरीसिंग राठोड (रा.काटगावतांडा), राजाभाऊ चंदर राठोड (रा.काटगावतांडा) ता. जि. लातूर अशा एकूण 5 इसमां विरुद्ध गातेगाव पोलीस ठाणे येथे गुरंन 51/2021, गुरंन 52/2021, गुरंन 53/3021, गुरंन 54/202, गुरंन 55/2021 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अवैध हातभट्टी दारुवर छापा; 2 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त

सदरील कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कोमवाड, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, राजेभाऊ म्हस्के, राम गवारे, हरून लोहार, युसुफ शेख, सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, राहुल सोनकांबळे, प्रमोद तरडे, भिष्मानंद साखरे, नितीन कटारे, नागनाथ जांभळे, प्रदीप चोपने तसेच गातेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास नवले, पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार कांबळे, पोलिस कर्मचारी बाबुराव डापकर, गिरी डी सी, व मन्मथ हिंगमीरे यांनी परिश्रम घेतले.

About The Author