शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद वस्तीगृहात अद्यावत कोवीड सेंटर होणार
आमदार बाबासाहेब पाटील व उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांनी केली जागेची पाहणी
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या स्वामी विवेकानंद महिला वस्तीगृहाच्या जागेत कोविड सेंटर करण्याच्या दृष्टीने उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार प्रसाद कुलकर्णी, तलाठी शाम कुलकर्णी आदींनी जागेची पाहणी केली.
सेच ऑक्सीजन बेडची सुसज्ज असे कोवीड सेंटर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाणचौर रस्त्यावर शिरूर ताजबंद येथे होत असल्याने रुग्णांची गैरसोय होणार नाही.व अशा कोविड रुग्णांना लातूर येथे जाण्याची आवश्यकता नाही. यासाठी तालुक्यातील खाजगी डॉक्टरांनी सुध्दा रुग्णांना सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच अहमदपूर येथे ग्रामीण रुग्णालयात पूर्ण क्षमतेचे ऑक्सीजन बेड उपलब्ध करुन देण्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी शिरूर ताजबंद येथील आढावा बैठकीत सांगीतले. तसेच तालुक्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहुण त्यावर विविध उपाय योजना करण्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत सुचित केले. यावेळी सोशल डिस्टंन्सचे नियम पाळण्यात आले.