माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्याहस्ते एम.एन.एस.बँकेच्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण
लातूर (प्रतिनिधी) : कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या रूग्णांवर उपचार करणारी यंत्रणाही कमी पडत आहे. ही बाब लक्षात घेवून महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतर्फे रूग्णांच्या सोयीसाठी रूग्णवाहीका देण्यात आली. या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मजगे नगर भागातील कैलास निवासस्थानासमोर भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते करण्यात आला असून सदरील रूग्णवाहिका मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.
यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, मनपा गटनेते शैलेश गोजमगुंडे, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, बाबासाहेब कोरे, सुभाषअप्पा सुलगुडले, सुर्यकांत शेळके, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, नगरसेवक बालाजी शेळके, एम.एन.एस.बँकेचे उपकार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते, मॅनेजर शिवाजी सुर्यवंशी, मॅनेजर गणेश पवार, पंकज जाधव, भाजपा युवा मोर्च्याचे सरचिटणीस अमोल गित्ते, सागर घोडके, काका चौगुले, गजेंद्र बोकन, अमित पोतदार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. सदर रूग्णवाहिका जनसेवेसाठी रवाणा झाली असल्याची माहिती बँकेचे उपकार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते यांनी दिली.
जेएसपीएम कॅम्पसमध्ये कोव्हिड सेंटरची सोय
शहरातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने बर्याच रूग्णांना बेड मिळत नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्या समन्वयातून एम.आय.डी.सी.भागातील जेएसपीएम कॅम्पसमध्ये 125 बेडची सुविधा असलेले मोफत कोव्हिड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कोव्हिड सेंटरचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. यामुळे लातूर शहर व परिसरातील कोरोणाग्रस्त रूग्णांची सोय होणार असल्याची माहिती जेएसपीएमचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना दिली.