विद्यार्थी हक्क कृती समितीच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी शंभू सुर्यवंशी तर युवती जिल्हाध्यक्षपदी पल्लवी हाके

विद्यार्थी हक्क कृती समितीच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी शंभू सुर्यवंशी तर युवती जिल्हाध्यक्षपदी पल्लवी हाके

लातूर (प्रतिनिधी) : विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्य च्या लातूर जिल्हाध्यक्षपदी विद्यार्थी चळवळीतील सक्रिय विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून युवा व्याख्याते शंभू सूर्यवंशी यांची तर पल्लवी हाके यांची युवती जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्रातील अनेक नामांकित वक्तृत्व वादविवाद स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या युवा वक्त्यांची जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. विद्यार्थी चळवळीतील नेहमी त्यांचा सक्रिय सहभाग अणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेतुन प्रेरित असलेल्या विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यामातून महाराष्ट्रातील तळागाळातील विद्यार्थ्यांचा न्याय व हक्कासाठी कार्य करावे अशी अपेक्षा विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष चेतन पाटील यांनी व्यक्त केली.

नूतन जिल्हाअध्यक्ष हे येणाऱ्या काळात विद्यार्थी हक्क कृती समिती मजबूतीने उभी करतील व विद्यार्थी वर्गाला आपला अभिमान वाटेल असे कार्य आपल्या हातून घडेल हीच अपेक्षा असे, मत विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सचिव रामराजे काळे यांनी व्यक्त केली आहे. सदरील निवड ही आजपासून एका वर्षापर्यंत अधिकृत असणार आहे. निवडीबद्दल सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले, व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author