बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1303
नवीन 1269 कोरोनाबाधित
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 43960 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1269 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 38 रुग्णांचा मृत्यु झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 1642 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 487 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 3255 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 782 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 61114 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 16127 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1054 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 43690 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1303 आहे. 178 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.