व्रृद्ध व्यक्तीस घरपोच लस द्या व शैक्षणिक संस्थेचे वस्तिग्रृह हस्तांतरीत करा
एन एस यू आय ची महापौराकडे मागणी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरात अनेक व्रृध्द पेशंट मोठ्या प्रमाणात असून ज्यांचे वेगवेगळे आँपरेशन झाले आहेत त्यांची लसीकरण केंद्रामध्ये जाण्यासाठी अडचन होत अश्या व्यक्तींची घरपोच लसीची व्यवस्था कराण्यात यावी तसेच लातूर शहरामध्ये दिवसेंदिवस कोविड रुग्ण संख्या वाढ होत असून बेडची आवश्यकता वाटल्यास लातूर शहरात दयानंद शिक्षण संस्था बार्शी रोड येथे मुलिंचे व मुलांचे तिन ते च्यार वस्तीग्रह आहेत तसेच बसवेश्वर महाविद्यालय, राजश्री शाहु महाविद्यालय यांचे वस्तीग्रह असुन हे शहराच्या चार वेगवेगळ्या जागी असल्याने या शिक्षण स्ंस्थेचे वस्तीग्रह अधिग्रहण केल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल तसेच मोटेगावकर क्लासेसचे ही दोन हजार विद्यार्थी असणारे वस्तीग्रह आहे यांची तपासणी करुण आवश्यकतेनुसार हे वस्तीग्रह हस्तांतरीत कराण्यात यावे अशी मागणी लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्याकडे एन एस यू आय च्या वतीने करण्यात आली आहे.