जिल्ह्यात 1775 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

जिल्ह्यात 1775 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

नवीन 1478 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 45735 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1478 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 1324 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 494 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 2864 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 984 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 62606 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15791 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1080 रुग्णांचा मृत्यु झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 45735 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1775 आहे.

About The Author