शिवनी बु. ग्रामपंचायत तर्फे निर्जंतुकीकरण मोहिम

शिवनी बु. ग्रामपंचायत तर्फे निर्जंतुकीकरण मोहिम

औसा (प्रतिनिधी) : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी औसा तालुक्यातील शिवनी बु. ग्रामपंचायत च्या वतीने दि. 23 एप्रिल रोजी गावात हायड्रोक्लोराइड या जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली आहे. सध्या औसा तालुक्यासह जिल्हाभर कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने गावात ग्रामपंचायत कडून ट्रॅक्टर द्वारे निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. यावेळी सरपंच सौ.शोभा धोंडीराम जाधव, उपसरपंच शिवम बुक्के लक्ष्मण तात्या जाधव, ग्रामपंचायत सदस्य शिवमल्हार माने, किशोर महाराज जाधव शिवणीकर, ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी चे नेते बबन आबा भोसले आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!