गोरक्षकावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी; मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना बजरंग दल यांच्या वतीने निवेदन !

गोरक्षकावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी; मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना बजरंग दल यांच्या वतीने निवेदन !

अहमदपूर( गोविंद काळे ) : लातुर शहरात गौवंशाची कत्तल होत असताना गौरक्षकांनी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन कत्तल चालू असलेल्या ठिकाणी तपासणीला गेले असता पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत दोन गौरक्षकांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला त्यात हे दोघेही जबर जखमी झाले ही मोब्लिंचिंग असून गौवंश हत्या व प्राणघातक हल्ला असे हे क्रूर कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यासाठी बजरंग दल यांच्या वतीने मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन दिले.

याविषयी सविस्तर माहीती अशी की, दि,24 एप्रिल रोजी लातूर शहरात गौवंशाची कत्तल होत असताना गौरक्षकांनी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन कत्तल चालू असलेल्या ठिकाणी तपासणीला गेले असता पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत सुर्यसिंह राजपूत व अजय रेड्डी या दोन गौरक्षकांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात हे दोघेही गौरक्षक जबर जखमी झाले ही मोब्लिंचिंग असून गौवंश हत्या व प्राणघातक हल्ला असे हे क्रूर कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करून सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टत चालवावे यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय, अहमदपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विश्व हिंदु परिषद बजरंग दल यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्यात गौवंश कत्तल बंद कायदा लागू असतानाही बेकायदेशीर लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखाने चालूच आहेत व रस्त्यावर उघड्यावर मास विक्री चालूच आहे या विरोधात वेळोवेळी तक्रारी अर्ज व आंदोलन करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. हे तुरंत बंद नाही झाल्यास विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बजरंग दल अहमदपूर, जिल्हा लातूरच्या यांच्या वतीने अहमदपूर उपजिल्हाधिकारी, यांच्याकडे एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी लातूर बजरंग दल जिल्हा संयोजक मधुकर धडे, हिंदू जागरण मंचाचे विभाग प्रमुख अँड. स्वप्निल व्हत्ते, व प्रखंड मंत्री रवी कच्छवे, प्रखंड अध्यक्ष खंडेराव टिकोरे, प्रखंड संयोजक गजानन चंदेवाड, शहराध्यक्ष नरेश यादव, शहर संयोजक सुदर्शन पाटील, अँड.दत्ता कुमठेकर, खुशाल ढेले, संतोष जाधव, ओमकार पुणे, ईश्वर चापकानडे, सुरज होनराव उमाकांत नागरगोजे, धनराज फुलमंटे, महंत क्षीरसागर अंकल, संजय नाईक, खंडोबा कोपनर, महादेव जायभाये, सचिन शिरसागर बाळूमामा लोहकरे, ऋषीकेश मोरे, सचिन चोले, महेश केंद्रे, रामभाऊ टिकोरे, गजानन मुंडे व असंख्य स्वयंसेवक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!