अहमदपूर आगारात प्रवाशासाठी पाणपोईचे उद्घाटन
रोकडेश्वर सेवाभावी संस्था व श्रीराम जानकी भवन यांचा सामाजिक उपक्रम.
अहमदपूर ( गोविंद काळे) : रोकडेश्वर सेवाभावी संस्था व श्रीराम जानकी भवन यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदपूर बस आगारात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
अहमदपूर येथील बस आगारात संपन्न झालेल्या कार्यक्रमात पानपोईचे उद्घाटन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आगार प्रमुख व्यवस्थापक पृथ्वीराज कोकाटे,स्थानक प्रमुख संतोषकुमार बिरादार, दिनकर मद्देवाड, नितीन धर्माधिकारी, बालाजी शिंदे,रोकडेश्वर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जुगलकिशोर शर्मा, गणपत कानवटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले की आता सध्या तीव्र उन्हाळा लक्षात घेऊन रोकडेश्वर सेवाभावी संस्था व श्रीराम जानकी भवन यांच्या संयुक्त विद्यमाने बस स्थानकातील पाणपोईचे उद्घाटन संपन्न झाले आहे. गेल्या नऊ वर्षापासून या संस्थेच्या वतीने पाणपोई लावली जाते,हा स्तुत्य उपक्रम असून या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक कार्यक्रम घेऊन गोरगरीब दिन, दलित,शोषिताना मदत केली जाते. भजनाची पुस्तक वाटप करणे, वैकुंठरताचे संचालन करणे,कोरोना काळातील रुग्णांना धान्य किटचे वाटप, गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम केले जाते,या पुढे याच पद्धतीने सामाजिक बांधिलकी ठेवून अन्य संस्थेने ही काम करावे असे आवाहन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक जुगलकिशोर शर्मा यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मारोती बुद्रुक पाटील, यांनी तर आभार श्यामसुंदर भुतडा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष सचिन बजाज,विनोद भुतडा, श्यामसुंदर भुतडा, सचिव आनंद बाहेती, विनोद भुतडा, गणेश शर्मा,रामप्रसाद सोलीवाल,भागवत सोलीवाल,रविराज भूतडा, मनोज पंचारे, बाबू मेन कुदळे आदींनी सहकार्य केले