लोहारा येथे एकाच दिवशी दोन रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यास सुरुवात!
उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हाचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या आदेशान्वये उदगीर तालुक्यातील अतिक्रमण मुक्त रस्ते करण्याची मोहीम प्रविण मेंगशेट्टी उपविभागीय अधिकारी उदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली व रामेश्वर गोरे तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्तीने सुरू आहे. मंडळ विभाग हेर अंतर्गत येणाऱ्या लोहारा गांवात मंडळ अधिकारी पंडित जाधव व तलाठी राजकुमार हालकुडे यांनी दोन रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे नियोजन केले, त्यानुसार नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात करण्यात आली. प्रथम लोहारा भाकसखेडा रस्ता ते बाबुराव मुसने यांच्या शेतापर्यंत व दुसरा रस्ता लोहारा गांवापासुन हैबतपूर – लोहारा शिवपर्यंत हे दोन रस्ते खुल्ले करण्यात आले. याप्रसंगी लोहारा येथील तंटामुक्ती अध्यक्ष त्रिंबक बिरादार, श्याम बिरादार, परमेश्वर बिरादार, विष्णुकांत बिरादार , रामदास बिरादार, कुमार सोनटक्के, महेश्वर स्वामी, विट्ठल जाधव , शहाजी जाधव, प्रदिप सुर्यवंशी, संगमेश्वर स्वामी, मनोहर कांबळे, वसंत कडाजीवाले, दिलीपराव पाटील, श्याम सोनटक्के ,बबन धनबा, महिपाल पाटील, शिवाजी सोनटक्के, धनराज पाटील, जीवन बिरादार, सुधीर बिरादार, इरप्पा पाटील, हरिश्चंद्र पाटील, शिरीष पाटील, माधव पाटील, वसंत पाटील, अभंग पाटील, माणिक पाटील, विठ्ठल सोनटक्के, राजकुमार साकोळे,महेश साकोळे, तानाजी सोनटक्के, सुभाष बिरादार, लक्ष्मण कमठाणे, चंद्रकात धनबा, उमाकांत हैबतपुरे, कपील पाटील, यशवंत पाटील इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन तलाठी राजकुमार हालकुडे यांनी केले.