अस्थित्वासाठी नव्हे, शेतकरी हितासाठी लढाई – आ. रमेशअप्पा कराड
लातूर (प्रतिनिधी) :लातूर बाजार समितीची निवडणूक कोणाच्या अस्थित्वासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी आणि हितासाठी अत्यंत महत्वाची आहे. गेल्या ३०-३५ वर्षापासून या बाजार समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता असून प्रत्येक वेळच्या काँग्रेसी संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या हिताला बगल देत देशमुख कुटुंबाच्याच हिताची जपणूक केल्याने कॉग्रेस व देशमुखशाहीच्या विरोधात प्रचंड असंतोष असून ही निवडणूक शेतकऱ्यांनी, मतदारांनी हातात घेतल्याने शेतकरी विकास पॅनलचा विजय कोणीच रोखू शकत नाही असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या प्रचार मेळावा मंगळवारी भाजपा नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील विश्व पॅलेस मंगल कार्यालयात झाला यावेळी आ. कराड बोलत होते याप्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रदेश भाजपाचे शैलेश लाहोटी, भाजपा नेते राजेश कराड, अमोल पाटील, लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, जिल्हा सरचिटणीस विक्रम काका शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, गोविंद नरहारे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, संतोष शिंदे, बाबू खंदाडे, उमेश बेद्रे, संभाजी वायाळ, बापुराव चामले, सुरज शिंदे, सुधाकर गवळी, भैरवनाथ पिसाळ, शरद शिंदे, विश्वास कावळे, नितीन कोरे, दिनकर पाटील, बाबासाहेब भिसे, बालासाहेब कदम, नागेश वाघमारे, धनराज शिंदे, शहर सरचिटणीस दिग्वीजय काथवटे, आदींची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यास बाजार समितीचे विविध गटातील मतदार बंधू भगिनी, भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
लातूर बाजार समितीवर गेली ३०-३५ वर्ष काँग्रेसची एकहाती सत्ता असताना आणि कोट्यावधीचे उत्पन्न असताना शेतकऱ्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेतले. बाजार समितीच्या प्रगतीसाठी काय केले असा प्रश्न उपस्थित करून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, बाजार समितीच्या परिसरात शेतकर्यांसाठी पिण्याचे पाणी, निवासाची व्यवस्था, शौचालय यासह कसल्याही सुविधा उपलब्ध करु शकले नाहीत. या निवडणुकीत मत मागण्याचा नैतिक अधिकार नसताना चार पाच पानाचा जाहिरनामा प्रसिध्द करून मतदारांकडे जात आहेत. ३०-३५ वर्षात काहीच करू शकले नाहीत तर येत्या ५ वर्षात काय दिवे लावणार असे बोलून दाखविले.
ही निवडणूक प्रस्थापिताच्या, हुकूमशाहीच्या विरूध्द असून शेतकऱ्याच्या स्वाभिमानासाठी आहे. आजपर्यंत गोर गरीब सर्वसामान्यांना सोबत घेवून काहीच नसताना संघर्ष केला. आता तर केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. निश्चितच शेतकऱ्यांच्या न्याय हक्काबरोबरच बाजार समितीच्या प्रगतीसाठी आणि सर्वांगीन विकासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही देवून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, देशमुखांनी आजपर्यंत मांजरा परिवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आडवणूकीचे आणि जिरवण्याचे काम केले. गोरगरीब माणसांना दडपशाही केली. आजपर्यंत सहन केले यापूढे कदापी सहन केले जाणार नाही.
पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे देशमुखांचे सुत्र या निवडणूकीत नष्ट होणार असून देशमुखांचे पिल्लावळ म्हणजे नंदीबैल आहेत. यांचा धनी मुंबईत राहतो मात्र कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार या पिल्लावळांना नाही. हे केवळ मान हलवण्याच्या कामाचे आहेत असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, लातूरची बाजार समिती देशात आदर्श बाजार समिती करण्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी येत्या २८ एप्रिल रोजी शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व आठराही उमेदवारांच्या कपबशी याच चिन्हावर फुलीचा शिक्का मारून शुभ आशिर्वाद द्यावेत आणि प्रचंड बहुमताने विजयी करून बाजार समितीच्या निवडणुकीत परिवर्तन घडवावे असे आवाहन केले.
कोणाच्याही कसल्याही अमिशाला बळी न पडता बाजार समितीचे हीत डोळयासमोर ठेवून मतदारांनी निर्णय घ्यावा. आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलच्या विजयासाठी प्रत्येकाने पायाला भिंगरी बांधून काम करावे असे आवाहन विनायकराव पाटील यांनी केले. कॉग्रेसवाल्यांनी बाजार समितीचे निर्माण केलेले राजकारणाचे आड्डे मतदारांनी उध्वस्त करावेत असे आवाहन करून गणेशदादा हाके यांनी आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वात लातूरची बाजार समिती आदर्श बाजार समिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे बोलून दाखविले तर दिलीपराव देशमुख यांनी गोरगरीब सर्वसामान्यांचे हित करणारे आ. रमेशअप्पा कराड यांचे नेतृत्व असून सर्वसामान्य कुटूंबातील कार्यकर्त्याला बाजार समितीची उमेदवारी देवून संधी दिली असल्याचे बोलून दाखविले.
या मेळाव्यात प्रदिप पाटील खंडापूरकर, शैलेश लाहोटी, गुरूनाथ मगे, संतोष शिंदे, बाबू खंदाडे, भागवत सोट, उमेश बेद्रे, संभाजी वायाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करून कॉग्रेसच्या भ्रष्ट कारभारावर काडाडून टिका केली व शेतक-यांच्या हितासाठी आणि बाजार समितीच्या प्रगतीसाठी शेतकरी विकास पॅनलच्या कबपशी या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले. प्रारंभी विक्रम काका शिंदे यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले तर शेवटी सुरज शिंदे यांनी आभार मानले. या मेळाव्याचे सुत्रसंचलन चंद्रकांत कातळे यांनी केले.
शेतकरी विकास पॅनलच्या प्रचार शुभारंभास भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हनमंतबापू नागटिळक, संगायो अध्यक्ष वैभव सापसोड, चंद्रसेन लोंढे, अरविंद सुरकूटे, प्रताप पाटील, रशिद पठाण, काशिनाथ ढगे, विष्णुदास मोहिते, व्यंकटराव जटाळ, विनायक मगर, शामसुंदर वाघमारे, पांडूरंग बालवाड, राम बंडापल्ले, सुरेश पाटील, सतिश बिराजदार, सुरेखा पुरी, लताताई भोसले, अशोक बिराजदार, दिपक वांगसकर, अहमद शेख, विजयकुमार मलवाडे, लक्ष्मण नागिमे, आदिनाथ मुळे, अरविंद पारवे, ईश्वर बुलबूले, हणमंत कतलाकूटे, गोविंद मुंडे, योगीराज साखरे, समाधान कदम, अच्युत भोसले, सचिन साबदे, प्रशांत शिंदे, हणमंत गव्हाणे, महेश कणसे, लिंबराज बोळंगे, पदमाकर होळकर, संजय ठाकूर, अशोक सावंत, मारूती शिंदे, रमेश लहाडे, वैजनाथ हराळे, चंद्रकांत वांगसकर, ज्ञानेश्वर जूगल, धनंजय जाधव, सचिन सवई, रूपेश काळे, संतोष जगताप, सुधाकर शिंदे, राहूल काळे, अल्ताफ शेख, किरण रोंगे, गोपाळ सोट, पुंडलिक बेंबडे, रमेश लहाडे, सुखदेव बरडे, गोविंद नांदे, बालाजी नाईकवाडे, दत्तात्रय सप्ताळ, विनोद कदम, विशाल जाधव, किशोर घुटे, सचिन लटपटे, शुभम खोसे, बापुराव बिडवे, किरण मुंडे, बालाजी नाईकवाडे, सचिन सुरवसे, सोमनाथ वाघमारे, सुधाकर शिंदे, धिरज पाटील, ज्योतीराम चिवडे, हणमंत कापरे, राम शिंदे, गणपत कदम, अरूण लांडगे यांच्यासह लातूर तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनीधी, कार्यकर्ते, मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.