शेतकर्‍यांच्या हितासाठी झगडणार्‍या महाविकास आघाडीच्या हाती सत्ता द्या – आमदार बाबासाहेब पाटील

शेतकर्‍यांच्या हितासाठी झगडणार्‍या महाविकास आघाडीच्या हाती सत्ता द्या - आमदार बाबासाहेब पाटील

शिरुर ताजबंद (गोविंद काळे) : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करणार्‍या काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस,व शिवसेना या महाविकास आघाडी सर्वच उमेदवारांना मतदान रुपीदान देवून सत्ता द्या विकास काय असतो तो मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने करुन दाखवतो असे आमदार बाबासाहेब पाटील यांनी शिरुर ताजबंद येथे दि.२३ एप्रिल रोजी बोलताना सांगीतले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काॅग्रेस नेते अॅड.हेमंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब जाधव,प्रचारसभेत लातूर जिल्हा शिवसेना (ठाकरे)प्रमुख बालाजी रेड्डी,माजी सभापती टी.एन.कांबळे,महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे,राष्ट्रवादी काॅग्रसचे शिवाजीराव देशमुख,माजी पंचायत समिती सदस्य गिरीश देशमुख, अहमदपूर शहर काॅग्रेसचे विकास महाजन सभापती पदाचे उमेदवार मंचकराव पाटील उपस्थित होते.
आमदार पाटील यांनी उपस्थित चेअरमन,सरपंच, उपचेअरमन, उपसरपच ,सोसायटी संचालक,ग्रामपंचायत सदस्य यांना सांगीतले की मंचकराव माझा भाऊ म्हणुन निवडणुकीला उभा राहीला नाही तर शेतकर्‍यांच्या अडीअडचणी समजून घेवून त्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशिल राहीलेला आहे.मग शिरुर ग्रामपंचायत असो की जिल्हा परिषदेत गटनेता म्हणुन काम असो .सन२०२२-२३ साली अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या शेतीतील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .अतिवृष्टी मदती पासून शिरुर ताजबंद सर्कल वगळले असता घरात कसे बसायचे म्हणुन शिरुर ताजबंद सर्कल मधील गावागावात जावून चेअरमन, सरपंच व शेतकर्‍यांकडे जावून त्यांच्या सह्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले व शिरुर ताजबंद सर्कलचा अतिवृष्टीत समावेश होवून याभागातील शेतकर्‍यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळवून दिली.शेतकरी संकटात असताना विरोधी पॅनल मधील एक तरी उमेदवार अथवा पॅनल प्रमुख तुमच्या कडे आला होता काय ! मग काम करणार्‍यांना उमेदवारी द्यायची नाही तर घरात बसून राहणार्‍यांना उमेदवारी द्यायची काय ? असा प्रश्न विचारताच उपस्थितांनी प्रंचड टाळ्याच्या गजरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्याचा प्रतिसाद दिला.

सन२०१७ सालचा शिरुर ताजबंद सर्कलला विमा मंजूर झाला असताना खोडसाळपणे शिरुर ताजबंद,उमरगा यल्लादेवी व उमरगा कोर्ट येथील शेतकर्‍यांना विम्या मिळण्यापासून वंचित ठेवले त्यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते मचंकराव व उमरगा यल्लादेवी चे चेअरमन राजकुमार सोमवंशी यांनी दोन वर्ष शासनाशी भांडून शेतकर्‍यांना १कोटी ७५ लक्ष रुपये विमा मिळवून दिला .अशा शेतकर्‍यांच्या हितासाठी लढणार्‍यांना उमेदवारी द्यायची की आमदारांचा भाऊ म्हणुन डावलायचे तुम्हीच सागा.वरिल सांगीतलेली एकही गोष्ट खोटी नाही आजही शासन दरबारी दिलेल्या अर्जाच्या ओसी प्रत मंचकराव याच्याकडे आहे तुम्ही ते पाहूनच त्यांना मतदान करा असे सांगून ज्याप्रमाणे तहसिल कार्यालय,नगरपरिषदेची देखणी ईमारत अहमदपूर उभारत आहे त्याच प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीची ईमारत उभी करण्याचा मनोदय व्यक्फ करुन त्या ईमारतीत बाजारात धान्य घेवून येणार्‍या शेतकर्‍यांसाठी ,हमाला विश्रांतीसाठी व पिण्याच्या शुध्द पाण्षाची व्यवस्था करण्यात येईल आमदार पाटील यांनी असे सांगीतले.

मंचकराव पाटील हे घराणेशाहीचे उमेदवार नसुन मतदार राजाच्या मनातील उमेदवार – माजी सभापती शिवाजीराव खांडेकर

घराणेशाही म्हणुन कोणाला सांगाता गेल्या तेवीस वर्षापासुन सत्ता तुमच्या ताब्यात असताना कृषी उत्पन्न बाजार समितीत काय चांगले काम केले ते सांगा असे माजी सभापती शिवाजीराव खांडेकर यांनी उपस्थित मतदारांना मार्गदर्शन करताना सांगीतले.मंचकराव पाटील यांच्या उमेदवारीला माजी मंत्री बाळासाहेब जाधव व आमदार बाबासाहेब पाटील यांनी विरोध केला होता त्यांना उमेदवारी नको तुम्हीच उमेदवार व्हा असे शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी ,माजी कृषी सभापती चंद्रकांत मद्दे व मला सांगीतले असताना अहमदपूर तालुक्यातील चेअरमन, उपचेअरमन, सरपंच, उपसरपच ,सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य ,व्यापारी व हमाल बांधवानी आग्रह धरल्याने मंचकरावांची पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढवण्याचे ठरले त्या विचार बैठकिचा मी साक्षीदार असल्याचे माजी सभापती खांडेकर यांनी सांगून ,ही निवडणुक कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे ,गेल्या अनेच वर्षापासून सत्ता ताब्यात असताना साधे पिण्याच्या पाण्याची तरी व्यवस्था केली आहे हे सांगावे,रस्त्यांची तीच बिकट अवस्था झालेली आहे. गावोगावी जावून खोटे आरोप करण्यापेक्षा एका बाजूला मतदार, एका बाजूला तुम्ही व एका बाजूला महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार थांबून चर्चा करा तुमच्याकडे सत्ता असताना काय काय केले ते सांगा आम्ही आमची सत्ता आल्यावर काय विकास करणार आहोत ते सांगू असे खांडेकर यांनी सांगीतले.

यावेळी महाविकास आघाडी पॅनलचे मंचकराव पाटील ,किशन पाटील,बालाजी कातकडे ,रामदास कदम, सतिश नवटक्के ,संतोष रोडगे,संजय पवार,जाधव चंद्रशेखर ,शिवाजी पाटील, दुर्गे नारायण,सौ.नागमोडे कैवल्या ,सौ. पवार इंदूताई,चंद्रकांत मद्दे,केंद्रे यशवंत, अनिल मेनकुदळे, धिरज घोगरे,शेख जाफर ,शिवाजी खांडेकर हे उमेदवार उपस्थित होते.

About The Author