ताळेबंदीत खा. सुधाकरराव श्रृंगारे यांनी दिला तृतीयपंथीयांना आधार
लातूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने सर्वत्र ताळेबंदी घोषीत करण्यात आलेली असताना लातूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांवर उपासमारीची वेळ आल्याचे समजताच जिल्ह्याचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी समाजाने नेहमीच उपेक्षित ठरविलेल्या तृतीयपंथी घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत तृतीयपंथीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन एक अभिनव उपक्रम राबविण्याचा संकल्प मनामध्ये धरून युवा नेते शंकरभैया श्रृंगारे यांच्या पुढाकारातून तृतीयपंथीयांना ताळेबंदीत पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करावी लागत होती. ती थांबवावे व ताळेबंदीमुळे त्यांच्यावर आलेली उपासमार दूर व्हावी या हेतूने त्यांना आधार देऊन दोन महिने पुरेल अशा दर्जेदार अन्नधान्य कीटचे वाटप केले आहे. यावेळी तृतीयपंथी यांच्या वतीने प्रिती माऊली लातूरकर, साक्षी माऊली लातूरकर हे उपस्थित होते. यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर १३० व्या सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष निखील गायकवाड, उद्धव लामतूरे, गौरव मदने, अर्जुन माने, महमद जफर, संग्राम वाघमारे व गणेश सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.