महसुल प्रशासनाच्या समय सुचकतेमुळे शहरात होणारी “फुल टु ” गर्दी टळली !

महसुल प्रशासनाच्या समय सुचकतेमुळे शहरात होणारी "फुल टु " गर्दी टळली !

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यात कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढतच असुन बेजबाबदार नागरिक अत्यावश्यक सुविधांच्या नावाखाली तसेच भाजीपाला खरेदीसाठी त्यातच अंब्याचा मोसम असल्यामुळे शहरातील रस्त्यावर दि २६ एप्रिल रोजी तोबा गर्दी केली होती परंतु महसुल प्रशासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे आज बाजारात होणारी “फुल टु ” गर्दी टळली.

याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर शहरात आत्यवश्यक सेवेच्या नावाखाली तालुक्यातील बेजबाबदार नागरिक भाजीपाला आणि आंबे खरेदीसाठी बाजारपेठेसह चाळीस फूटी रस्त्यावरील दैनंदिन भाजीपाला बाजारात नागरिकांची मोठी गर्दी उसळत होती अक्षरशः कोरोनाचे सर्व नियम पायंदळी तुडवत नागरिकांनी दि २६ एप्रिल रोजी बाजारपेठेत ‘फुल्ल टू’ गर्दी केली असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत असल्याने एकप्रकारे कोरोनाला आमंत्रणच दिले जात होते.
१५ एप्रिल ते १ मेपर्यंत १५ दिवस राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर करताना सकाळी ७ ते ११ या वेळेतच अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, सध्या आंब्यांचा सीझन असल्याने आंबे, भाजीपाला व किराणा खरेदीसाठी शहरातील आझाद चौक, भाजी मार्केट ते मेन रोड, शिवाजी चौक, कॉलेज रोड बस स्थानकासमोर साठ फूटी रस्त्यावर आठवडी बाजारासोबतच दैनंदिन भाजीपाला बाजारात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची दररोज मोठी गर्दी उसळत आहे. मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद असली तरी दररोज लहान-मोठी वाहने घेऊन नागरिक बिनदिक्कतपणे शहरातील गल्लीबोळात ये-जा करीत आहेत.
सदरील होणारी गर्दी ही नगरपालिकेने जिल्हा परिषद शाळेसमोरील मैदानात भरत असलेली भाजीपाला बाजार पेठ बंद केल्यामुळे होत असल्याचे महसुल प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी समय सुचकता दाखवत तात्काळ दि २६ एप्रिल रोजी लागलीच दुपारी २:०० वाजता उप- जिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार प्रसाद कुलकर्णी नगर पालीकेचे मुख्यधिकारी त्र्यंबक कांबळे पोलीस निरिक्षक नानासाहेब लाकाळ तसेच भाजीपाला व्यापारी यांची तहसील कार्यालयात बैठक घेऊन जिल्हापरिषद मैदानावर बंद केलेले भाजी मार्केट पुन्हा स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला तसेच दररोज सकाळी ६ : ०० वाजेपासुन महसुल, पोलीस, न.पा प्रशासन बाजारात गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी व गर्दी होण्याच्या आगोदरच सतर्क राहुन कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्यामुळे व कारवाईच्या भितीमुळे आज दि. २७ एप्रिल रोजी शहरात तसेच जिल्हा परिषद मैदानावरील भाजी पाला मार्केट मध्ये नागरीकांचा शुकशुकाट पहावयास मिळाला सोशल डिस्टंनसिंगचे तसेच मास्कचे तंतोतंत पालन करण्यात आले.

About The Author