कोरोनाच्या पार्श्वभूमिवर भाजयुमोची “कोव्हिड-19 हेल्पलाईन”
कोरोनामुक्तीचा संकल्प : 24 तास रूग्णसेवेसाठी भाजयुमोची टीम तत्पर
लातूर (प्रतिनिधी) : कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेेंदिवस वाढत आहे. परंतु त्या प्रमाणात उपाय करणारी आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. परिणामी बेड, व्हेंन्टिलेटर, ऑक्सीजन बेड अभावी कोरोनाग्रस्त रूग्णांवर काही वेळा जीव गमावण्याची वेळ येत आहे. हे वास्तव चित्र शहरात सुरू असल्यामुळे लातूर शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांची सोय व्हावी यासाठी भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून “कोव्हिड-19 हेल्पलाईन” सुरू करण्यात आली असून 24 जणांच्या मेगा टीमच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रूग्ण व नातेवाईकांना मोठी मदत होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर त्यांच्या या विधायक कार्याचा आदर्श इतर तरूणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
लातूर जिल्ह्यातील कोरानाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या रूग्णांवर उपचार करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. परिणामी लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 66548 वर गेलेली आहे. यापैकी 50808 रूग्ण उपचार घेवून बरे झालेले आहेत तर सध्या उपचार घेणार्या रूग्णांची संख्या 14584 वर गेलेली आहे. तर अद्यापपर्यंत 1156 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे ही वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी शहरातील रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत. यासाठी भाजपा युवा मोच्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांतदादा पाटील यांच्या सुचनेनुसार व माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपा शहर जिल्हाध्यख गुरूनाथ मगे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोतर्फे “कोव्हिड-19 हेल्पलाईन” सूरू केली आहे. 24 जणांची जंम्बो टीम तयार करण्यात आली असून या टीमच्या माध्यमातून लातूर शहर परिसरातील रूग्णांना तात्काळ बेड, व्हेंन्टीलेेटर, ऑक्सीजन बेड या सुविधेबरोबरच रेमडेसेवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही टीम कोरोना रूग्णांच्या सेवेत 24 तास कार्यरत असून या सेवेमुळे लातूर जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील अनेक रूग्णांना जीवदान मिळालेले आहे. ही सेवा सदैव सुरू राहणार असून लातूर शहरातील नागरीकांनी भाजपा युवा मोर्च्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या “कोव्हिड-19 हेल्पलाईन”सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे.
हेल्पलाईनच्या माध्यमातून जनसेवा…
कोरोनाच्या या जागतिक संकटामुळे सर्व नागरिक अडचणीत आलेले आहेत. कोणीही कोणाला मदत करण्यासाठी कोरोनाच्या भीतीने पुढे येत नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेवून भाजयुमोने 24 पदाधिकार्यांची टीम तयार करून “कोव्हिड-19 हेल्पलाईन”च्या माध्यमातून जनसेवा सुरू केली आहे. युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 24 जणांची टिम कार्यरत असून लातूर शहरातील कोरोनाग्रस्त नागरीक व कुटुंबियांनी अॅड.गणेश गोजमगुंडे, अमोल गित्ते, गजेंद्र बोकण, सागर घोडके, संतोष ठाकूर, रवीशंकर लवटे, गणेश बेस्के, सुरज, पुनम पांचाळ, काका चौगुले, अॅड.सचिन कांबळे, आकाश बजाज, चैतन्य फिस्के, अरूण जाधव, अॅड.किशोर शिंदे, ईश्वर सातपुते, राजेश्री होणाळे, गौरव बिडवे, शैलेश बिराजदार, गणेश सगर, ऋषिकेश क्षीरसागर, नवनाथ ढेकरे, राम उद्देवाल यांच्याशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी चंद्रशेखर पाटील यांच्या 7767848425 या मोबाईवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.