गुड मॉर्निंग पथकाकडून सलग दुसऱ्या दिवशी 58 नागरीकावर दंडात्मक कार्यवाही, 23 हजार 500 रु. दंड वसुल
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील पोलिस स्टेशनच्या वतीने गुड मार्निंग मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते त्या अंतर्गत सकाळी फिरणाऱ्या 58 नागरीकांवर दंडात्मक कार्यवाही करुन 23 हजार 500 रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता परिस्थिती खुप भयानक आहे. कोरोना सारख्या महामारी वर मात करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने रात्र-दिवस अविरत कार्य चालु आहे.वेळोवेळी सुचना देवूनही काही नागरीक नियमांचे पालन करीत नाहीत.संपुर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागली असुन शासनाच्या वतीने कडक निर्देश देण्यात येवून सुद्धा नागरिक बिनधास्त बिना मास्कचे फिरताना शहराच्या आजूबाजूला रस्त्यावर दिसत आहेत.
आज दि. 25 एप्रिल 2021 रोजी सलग दुसऱ्या दििवशी पोलीस स्टेशन अहमदपूर च्या वतीने गुड मॉर्निंग मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते त्यात सकाळी थोडगा रोड, वसवाडी रोड, अहमदपूरातील वेगवेगळ्या रोडवर फिरणार्या 58 लोकांना पकडून पोलीस स्टेशनच्या ग्राऊंडवर वर आणण्यात आले त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करून 23 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
सदरची मोहीम माननीय पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार,पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव, एकनाथ डक पोलीस हवालदार ,रमेश आलापुरे, सखाराम भिसे, कैलास चौधरी, भाऊसाहेब साळवे हनुमंत माने, प्रशांत इबीतकर,संतोष गेडाम, जुल्फिकार लष्करे, अभिजीत लोखंडे, सुदर्शन घुगे व नगर पालिका अहमदपूर चे माधव पानपट्टे, प्रकाश जाधव व इतर सर्वांनी मिळून कार्यवाही केली.
पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे की स्वतःला व इतरांचे जीवाला धोका होणार नाही असे नागरिकांनी वागू नये आपण घरात सुरक्षित राहिलो तरच कोरोणावर विजय मिळू शकतो असे सांगण्यात आले आहे.