शेतकऱ्यांना पोखराचे अनुदान तातडीने वाटप करा – सम्राट मित्र मंडळाची मागणी

शेतकऱ्यांना पोखराचे अनुदान तातडीने वाटप करा - सम्राट मित्र मंडळाची मागणी

अहमदपूर (गोविंद काळे) : कृषिविभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पोखरा योजनेचे रखडलेले अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अशी आग्रही मागणी सम्राट मित्रमंडळाच्या वतीने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

येथील तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की, अहमदपूर-चाकूर तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी कृषी विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पोखरा योजनेंतर्गत शेतीविषयक साहित्य जसे शेडनेट, पाईपलाईन, ठिबक, विहीरी आदी मिळण्याबाबत प्रस्ताव दिले होते.त्या नुसार मंजूरी प्रमाणे शासनाकडून पैसे येतील तो पर्यंत उसने/ व्याजी पैसे काढून ही कामे करून घ्यावे या हेतूने शेतीचा कालावधी जावू नये म्हणून व्याजाने पैसे काढून त्या पैशातून या योजनेतील कामे पूर्ण केली आहेत मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून कृषिविभागाकडून संबंधीत बाबी विषयी येणारे अनुदान अद्याप शेतकर्यांना मिळालेले नाही. त्यामूळे येथील शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.संबंधीत अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असून शेतकर्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे असे अनेक शेतकरी बोलून दाखवत आहेत. या योजनेअंतर्गत थोडीफार पध्दतीने सर्व जिल्हात अशीच अवस्था असू शकते असू आमचे मत बनत आहे.

तरी कृपया सदरील प्रकरणी आपण वैयक्तीक लक्ष घालून अहमदपूर तालुक्यातील मोजे कूमठा व परिसरातील तसेच एकूणच जिल्ह्यातील पोखरा योजनेंतर्गत पात्र शेतकर्यांचे रखडलेले अनुदान तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावे अन्यथा या प्रकरणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ही विनंती.

About The Author