सुनेगाव(शेंद्री) शेनी ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने तीन गावांचे हायड्रोक्लोराइड औषधाने निर्जुंतीकरण
अहमदपूर( गोविंद काळे ) : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे . त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुक्यातील सुनेेेेगाव(शेंद्री)शेनी ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने दि २८ एप्रिल रोजी तीन गावात हायड्रोक्लोराइड या जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली आहे . सध्या अहमदपूर तालुक्यासह जिल्हाभर कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे . त्या अनुषंगाने सुनेेगाव, शेंद्री, शेनी या तीन गावात ग्रामपंचायत कडून दोन पेट्रोल फवाऱ्याद्वारे प्रत्येक गल्लीबोळातील रस्ते, चौक, नाल्या, शौचालय , गुरांचे गोठे आदी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे तसेच गावातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी मास्क सॅनिटायजरचा वापर करावा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये सुरक्षित अंतर ठेवावा कोरोनाची लक्षणे असल्याचे जाणवु लागल्यास त्वरीत कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत कार्यालया तर्फे करण्यात आले हायड्रोक्लोराइड फवारणी करण्यासाठी पाठीवर पेट्रोल फवारा घेऊन हनमंत थगनर, निळकंठ जायभाये यांनी मेहनत घेतली.
यावेळी सरपंच उषा गोपीनाथ जायभाये, उपसरपंच चंंद्रकला ढाकणे, सदस्य आरती बेले, राजु होळकर, भास्कर गीत्ते आदी सह समाजसेवक राम जायभाये,नरहरी थगनर, श्रीकांत केंद्रे, पत्रकार गोविंद काळे, प्रल्हाद काटे , दयानंद काटे, रमेश काटे, भरत काटे, भाऊसाहेब होळकर, बाबुराव थगनर, निवृत्ती होळकर, मंगेश जायभाये, पवन जायभाये,खुशाल जायभाये, दिपक थगनर, अनिल थगनर, ऋषी जायभाये, मारोती ढाकणे, सायस फड, दिलीप फड, बाळु फड, हरीबा केंद्रे, सुधाकर फड,सेवक बालाजी वाघमारे आदीची उपस्थिती होती.