डॉ.अनुजा बेरळकर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासाठी ठरत आहेत देवदुत
विठाई कोवीड सेंटरकडून रुग्णांची व्यवस्थित सुश्रुषा
अहमदपूर ( गोविंद काळे) : अहमदपूर येथील विठाई हॉस्पिटल येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची अगदी व्यवस्थित व चांगल्या प्रमारे सुश्रुषा डॉ. अनुजा बेरळकर यांच्या मार्फत केली जात असुन रुग्णांकडून चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया येत आहेत.
या विषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर येथील विठाई हॉस्पिटल व कोविड सेंटर ला 13 एप्रिल ला परवानगी-मिळाली असुन सोळा बेड ऑक्सिजनचे, 1 बेड वेंटिलेटरचा, 2 बायपॅक, हायक्लो नेझल ऑक्सिजन 1 असे इतर बेड असे एकुण 40 बेडचे सुसज्ज असे हॉस्पिटल आहे. कोविड सेंटरला मान्यता मिळाल्या पासूनच कोविड पॉझिटिव्ह रूग्णसेवेला सुरुवात करण्यात आली असुन आतापर्यंत जवळपास 12 पॉझिटिव्ह रुग्ण अगदी बरे होवून आपल्या घरी सुखरुप परतले आहेत.
कोरोना या साथीच्या महाभयानक रोगाने या शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात चांगलेच हातपाय पसरले असून दिवसेंदिवस येथे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. याबरोबरच तालुक्यात मृत्यूचे प्रमाणात कमालीची वाढ होत आहे.रुग्णांची येथेच सोय व्हावी या दृष्टीने अहमदपूर येथे विठाई हॉस्पिटल येथे ऑक्सीजन बेड सह मान्यता मिळाली असून तशी सुविधा येथे करण्यात आली आहे. आता या परिसरातील रुग्णांची फरफट-धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे. अहमदपूर शहर व ग्रामीण भागात कोरोना या साथीच्या रोगाने कहर केला आहे या भागातील रुग्णांना येथे उपचार घेण्याची सुविधा खूप कमी आहे येथे रुग्णांना कुठेही चांगली सुविधा नाही बॅड उपलब्ध होत नाहीत म्हणून येथील रुग्ण लातूर, सोलापूर, हैदराबाद येथे उपचारासाठी जावे लागत आहे.
या मोठ्या शहरातील आणि मोठ्या रुग्णालयातील खर्च भरमसाठ न परवडण्यासारखा आहे सर्व खर्च लाखांवर यायचा व रुग्ण राहील किंवा नाही याची शाश्वती नव्हती या शहरातील हैदराबाद, सोलापूर गेलेल्या अनेक रुग्णांचे निधन झाले आहे.
यामुळे या भागातील कोरोणा रुग्णांनी चांगलीच धास्ती घेतलेली आहे. आता रुग्णांना येथेच सुविधा झाल्यामुळे बरेच रुग्ण उपचार घेवून सुखरुप आपल्या घरी जात असतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरातील व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची आता येथे चांगली सोय होत आहे.
याबाबत विठाई हॉस्पिटल उपचार घेत असलेल्या मल्हारी माधवराव खांडेकर वय 85 वर्ष रा. आंडगा (उत्तर), या रुग्णांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मागील चार दिवसापुर्वी मला अहमदपूरला अॅडमिट करण्यासाठी आणले. मला श्वास घ्यावयाला त्रास होत होता. पहिल्यांदा ग्रामीण रुग्णालय, येथे आम्ही गेलो मात्र त्या ठिकाणी बेड उपलब्ध नव्हता आणि ऑक्सिजन, वेंटिलेटर ची ही सुविधा नाही असे आम्हाला कळाले. या बाबत माझा मुलगा गोविंद, उद्धव खांडेकर यांनी डॉ. बिरादार यांना भेटले मात्र त्यांनीही बेड उपलब्ध नाही असे आम्हास सांगितले. तेंव्हा मला वाटले की मी आता काही वाचणार नाही. तब्बल दोन ते तीन तास आम्ही अंबेजोगाई रोडवर ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर होतो. मात्र या दवाखान्याविषयी आम्हाला माहिती मिळाली आणि त्यावेळी माझे ऑक्सिजन केवळ 30 टक्के एवढेच होते त्यामुळे मी आणि माझ्या परिवारातील सर्वजण घाबरुन गेलो होतो मात्र डॉ. अनुजा बेरळकर यांनी आम्हाला अॅडमिट करुन चांगल्या प्रकारे माझ्यावर उपचार केला आज रोजी मला खुप बरे वाटत आहे. असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी उपचार घेत असेलेल्या रुग्णांपैकी यशोदा पिराजी कच्छवे यांनी व त्यांचा मुलगा संजय कच्छवे यांनीही हास्पिटल संदर्भात चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. यावेळी बोलताना अहमदपुर तालुक्यातील पहिली महिला फि जिशियन, अतिशय उत्कृष्टपणे कोविड सेंटर चालविणार्या डॉ.अनुजा बेरळकर म्हणाल्या की, आत्तापर्यंत आमच्या रुग्णालयातुन जवळपास 12 रुग्ण अगदी ठणठणीत होवून सुखरुप घरी गेले आहेत. आमच्या रुग्णालयात 16 बेड ऑक्सिजनची व्यवस्था आहे तसेच ब्लड बँक सुविधा पण आहे, तसेच एक्स-रे मशिन सुध्दा उपलब्ध आहे. एकुण आमच्या हॉस्पिटलमध्ये 40 बेड उपलब्ध आहेत. याकाही निसंकोचपणे आमची पुर्ण टिम कार्य करत आहे.
या कोविड सेंटर येथे डॉ. अनुजा बेरळकर यांच्यासह डॉ. सुमित्रा बेरळकर, डॉ. राम बेरळकर, डॉ. अनुप बेरळकर हे रुग्णांवर चांगल्या प्रकारे सुश्रुषा करीत असुन त्यांच्या सोबत सुवर्णा लाटकर, निशा गायकवाड, दिवका (किरण) कदम, सुनिल बेरळकर, बबन गुट्टे, राम चिगळे आदी रात्रं-दिवस उत्कृष्टपणे रुग्णांची सेवा करीत आहेत. अश्या प्रकारे कोविड सेंटरमुळे रुग्ण बरे होत आहेत.