मोठी बातमी : कर्नाटकातून येणारा 27 लाखांचा गुटखा निलंगा पोलिसांनी पकडला

मोठी बातमी : कर्नाटकातून येणारा 27 लाखांचा गुटखा निलंगा पोलिसांनी पकडला

निलंगा ( नाना आकडे ) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू राजरोसपणे कर्नाटकातून औराद शहाजानी मार्गे लातूर जिल्ह्यात येत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी शिरूर आनंतपाळ पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याने, लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त करून गुन्हा दाखल केला होता. सदरील गुटखा हा औराद शहाजानी मार्गे येत असल्याचे सर्रास बोलले जात आहे.  अशाच पद्धतीची माहिती गुप्त बातमीदारांनी औराद शहाजानी आणि निलंगा पोलिसांना कळवली. याची चर्चा आहे. मात्र यासंदर्भात औराद शहाजानी पोलिसांनी फारसे गांभीर्य न घेता सदरील गुटखा घेऊन जाणाऱ्या ट्रक वर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र निलंगा पोलिसांनी सापळा रचून सदरील ट्रक पकडला आहे.

मोठी बातमी : कर्नाटकातून येणारा 27 लाखांचा गुटखा निलंगा पोलिसांनी पकडला

 युवकांच्या आरोग्याचा विचार करून गुटखा वापर, उत्पादन, विक्री, वाहतूक यास महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केले आहे. असे असतानाही एका मोठ्या ट्रक मधून सुमारे 27 लाख रुपयांचा गुटखा औराद शहाजानी मार्गे येत असल्याची माहिती खबर्‍याने पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे निलंगा पोलिसांनी उदगीर रोड येथे के ए 38- 64 82 या क्रमांकाचा ट्रक आडवला, त्याची तपासणी केली असता आत मध्ये गुटखा असल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक जी जे क्षिरसागर यांनी लगेच कारवाई करून अन्न व औषध प्रशासन विभागाचे संपर्क साधला. त्यांचे प्रतिनिधी घटनास्थळी आल्यानंतर 27 लाखांचा गुटखा व दहा लाखाचा ट्रक जप्त करण्यात आला. ट्रक मालक विनोद कुमार कोटेरा व सिकंदर समीर शेख यांच्या विरोधात निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निलंगा पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोठी बातमी : कर्नाटकातून येणारा 27 लाखांचा गुटखा निलंगा पोलिसांनी पकडला

About The Author