1446 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

1446 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

नवीन 958 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 57023 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 958 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 30 रुग्णांचा मृत्यु झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 1728 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 341 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 2400 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 617 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 71080 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 12781 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1276 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 57023 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1446 आहे. .

About The Author