महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून कोविड रुग्णांना कार्पेट कव्हर द्या – डॉ नरसिंह भिकाणे
अहमदपूर( गोविंद काळे ) : राज्य शासन महाराष्ट्रातील 85 टक्के गरीब जनतेसाठी दरवर्षी विमा काढते व त्या अंतर्गत महात्मा फुले आरोग्यदायी योजना चालू आहे.या योजनेत 950 पेक्षा जास्त आजारांचा समावेश आहे.त्यातच कोविड या महामारी पसरवणाऱ्या आजाराचा तात्काळ समावेश करावा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.आजघडीला शासकीय रुग्णालयात जागा नसल्याने रुग्ण खासगी रूग्णालयात जात आहेत व तिथे लाखो रुपये बिल होत असल्याने ते भरण्यास गरीब जनता असमर्थ ठरत आहे व त्यांना जीव गमवावा लागत आहे.तरी पालकमंत्री यांनी पालकत्व स्वीकारत खासगी रुग्णालयांना गरीब कोविड रुग्णांसाठी महात्मा फुले आरोग्यदायी योजने अंतर्गत इलाज करण्याचा आदेश काढावा,परिपत्रक काढावे व ज्या रुग्णालयात महात्मा फुले आरोग्यदायी योजना लागू नाही तिथेही या योजनेचे “कार्पेट कव्हर” रुग्णांना द्यावे.कारण हे नाही झाले तर गरीब जनता इलाजा अभावी रस्त्यावर प्राण सोडेल.सद्यस्थितीत हे कार्पेट कव्हर शासनाला सांगून मंजूर करून घेणे अत्यावश्यक आहे कारण अनेक खाजगी रुग्णालयात महात्मा फुले आरोग्यदायी योजना नाही.महाराष्ट्रातील 85 टक्के गरीब जनतेच्या इलाजाची जीम्मेदारी राज्य शासनाची आहे त्यासाठीच एवढ्या लोकांचा विमा शासन दरवर्षी काढते.12 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात फक्त सव्वा दोन कोटी रुग्णांना या योजनेचा लाभ भेटला आहे,महाराष्ट्रात 5 लाख रूग्णांपैकी फक्त 50 हजार रुग्णांना लाभ भेटला आहे.ही योजना सक्षम केली व प्रत्येक गरिबाला लाभ भेटला तर अनेक मृत्यू वाचतील.85 टक्के गरीब जनता असताना व 85 टक्के गरीब जनतेचा विमा असतानाही फक्त 9 टक्के लोकांनाच फायदा होणार असेल तर शासन झोपले आहे काय व एवढ्या मोठ्या विम्याचा पैसा जातो कुठे असा प्रश्नही शेवटी डॉ भिकाणे यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांना विचारला आहे व यावर लवकरच कार्यवाही झाली नाही तर गरीब जनता कुठल्याही रुग्णालयांमध्ये बिल भरणार नाही व महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्यासोबत उभी असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.