पाणीपुरवठा प्रश्नावरून जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी कंत्राटदारास खडसावले

पाणीपुरवठा प्रश्नावरून जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी कंत्राटदारास खडसावले

शहराती प्रत्येक भागात दहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची दिली सुचना

नगरपरिषद व कंत्राटदार यांनी समन्वयाने काम करावे

अहमदपूर (गोविंद काळे) : लिंबोटी धरणावरून पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम पूर्ण होऊ सुद्धा कंत्राटदाराच्या चुकीच्या धोरणामुळे पाणी वितरणात येणाऱ्या अडचणी संबंधीच्या आढावा बैठकीत जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांनी संबंधित कंत्राटदार यांना खडसावले असून दहा दिवसात पाणीपुरवठा व्यवस्थित न केल्यास लागलेल्या दंडास आपण पात्र असाल असी तंबी दिली आहे.

याविषयी सविस्तर माहीती अशी की अहमदपूर शहरात चार झोन मध्ये पाणीपुरवठा केला जात असून त्यातील दोन झोन मध्ये प्रत्येकी पंधरा दिवस पाणीपुरवठा होत आहे तर राहिलेल्या दोन झोन मध्ये 25 दिवस व 45 दिवसाला पाणीपुरवठा होत आहे याबाबत तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत नगरपरिषद व कंत्राटदार यांनी समन्वयाने काम करून उर्वरित पाणी वितरणाचे काम त्वरित करावे त्याचबरोबर शहरातील प्रत्येक झोनमध्ये किमान दहा दिवसांआड पाणीपुरवठा करावा व कंत्राटदाराने एक महिन्याच्या आत सदरील सर्व ठिकाणची पाण्याची वितरणाची व्यवस्था करून घ्यावी व त्यासाठी लगणारे तांत्रिक सहकार्य सहाय्यक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने करावे
या सर्व कामाचा प्रगती अहवाल मुख्याधिकारी जिल्हा प्रशासनाकडे दररोज सादर करावा अशा सूचना करण्यात आल्या यावेळी कंत्राटदाराने उर्वरित राहिलेले पाणी वितरणाचे काम दीड महिन्यात पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंबंधी सूचना दिल्या तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नगरपालिका प्रशासन व कंत्राटदार यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना दिल्या याबाबत दिरंगाई केल्यास माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची तंबीही संबंधिताला दिली त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून येत्या एक महिन्याच्या आत अहमदपूर शहरातील झोन क्रमांक 2 व 3 मधील पाणीपुरवठा किमान दहा दिवसावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बैठक

अहमदपूरचा पाणी प्रश्न गेली कित्येक महिन्यांपासुन प्रलंबित असून वारंवार सूचना बैठका घेऊन सुध्दा प्रश्न मिटत नाहीत यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नगरपरिषद मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्या उपस्थितीत आज समन्वयाची बैठक घेण्यात आली त्यात सर्वांनी समन्वयाने काम करून प्रगती अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत व पाणीपुरवठा दर दहा दिवस आड करण्यासंबंधी सर्व यंत्रणेला सांगितले असल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवने यांनी सांगितले.

चौकट : –
झोन नुसार पाणी वितरण करणार

नगरपरिषदच्या तीन झोन मध्ये पाणी वितरीत करण्याचा कालावधी हा कमी अधिक आहे तो येत्या दहा दिवसात प्रत्येकी दहा दिवसाआड करण्यासंबंधी जीवन प्राधिकरण व कंत्राटदार यांच्या साह्याने करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.

About The Author