दिलीपराव देशमुख यांच्या मागणीला यश; अहमदपूर-चाकूर शहरासाठी दोन कोटी रुपये मंजूर
अहमदपूर ( गोविंद काळे ) : भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख यांनी अहमदपूर व चाकूर शहराच्या विकासासाठी विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्या मागणीचा सारासार विचार करून, विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी अहमदपूर व चाकूर शहराच्या विकासासाठी प्रत्येकी एक- एक कोटी रु.च्या निधीस मंजुरी प्राप्त करुन दिली आहे.
विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी दिलीप देशमुख यांना सदर मंजूर निधीचे पत्र पाठवून त्यात नमूद केले आहे की, आपण माझ्याकडे मागणी केल्यानुसार कामाचे स्वरूप ‘नगर विकास विभाग’ २०० लक्ष रु. निधी शासन स्तरावर मंजूर करण्यात आला आहे. सदर निधी हा माझ्या प्रामाणिक हेतूने केलेल्या वैयक्तिक पाठपुराव्यातून मंजूर झाला असल्याने सदरील सर्व कामे उच्च गुणवत्तेची होतील, याकडे आपण विशेष लक्ष द्यावे. व सदरील कामे पारदर्शीपणे वेळेत पूर्ण करून घेऊन कामाच्या प्रगती बाबत मला अवगत करावे. सदर निधी अहमदपूर- चाकूर शहराच्या विकासासाठी खर्च होणार असल्याने, शहराच्या विकासात, वैभवात भर पडणार असल्यामुळे दिलीपराव देशमुख यांचे शहरवासियांतून अभिनंदन होत आहे.