महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

अहमदपूर ( गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रोफेसर ह. भ. प.डॉ. अनिल मुंढे हे होते तर, डॉ. पांडुरंग चिलगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर, या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी डॉ अनिल मुंढे म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता याबरोबरच राष्ट्र उद्धाराचे कार्य केले ; ते खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत होते, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ .सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी अजय मुरमुरे, बाळासाहेब कराड, यांच्यासह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे विद्यार्थी प्रतीक्षा जेलेवाड, दीपज्योती मठपती, दुर्गा ऊपरवाड, सुप्रिया चव्हाण, लखन ससाणे,रमाकांत गवळी,श्रीराम दोडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित मोठ्या संख्येने होते.

About The Author