एन.एम.एम.एस. परीक्षेत यशवंत विद्यालयाचे घवघवीत यश
अहमदपूर ( गोविंद काळे) : डिसेंबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यशवंत विद्यालयाच्या तब्बल २३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत.
यात काडवदे ओम गिरीश, मरेवाड प्रसाद संग्राम, कांडणागिरे चिराग मनोज, बेद्रे ऋतुजा राम, कांडणगिरे चिन्मय मनोज, पुणे वैष्णवी गंगाधर, राठोड प्रसाद बाबाराव, व्हते सुशिल शिवराज, व्हत्ते प्रशांत शिवराज, केंद्र स्वप्नील संग्राम, चामे भावेश नंदकिशोर भिकाने स्नेहा नामदेव, कोपले गायत्री धनंजय, दाचावार ज्ञानदा राम, कोलेवाड श्रृती विनोद, ढवळे वैशाली राहूल बेरळकर सृष्टी गणेश, बनसोडे राजनंदिनी सिद्धार्थ, बारुळे राजनंदिनी गजानन, गिरी अंकिता हनमंत, कांबळे रागिनी गिरीधर, डावळे राही संदीपान, मठपती अनिकेत महालिंग, या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख संतोष मालवदे, अनंत कुमार चोचंडे, अमोल लगड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
गुणवंत विद्यार्थाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, सचिव डी. बी. लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले , उपमुख्याध्यापक उमाकांत नरडेले , पर्यवेक्षक दिलीप गुळवे , गजानन शिंदे,राम तत्तापुरे, सोमनाथ स्वामी, यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.