प्रयत्नाला विश्वासाची जोड लागली तर यशोशिखर गाठता येते – शिवानंद हेंगणे
अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील कमला नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मधुकरराव मदने व स. शि. मिरजगावे चंद्रकांत यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव शिवानंद हेंगणे हे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सदस्य बाबूराव चौधरी, चंद्रशेखर ढेले व संस्था अध्यक्ष आशिष हेंगणे यांनी मार्गदर्शन केले.
या सेवापूर्ति सोहळ्याच्या निमित्ताने अध्यक्षीय समारोप करताना श्री शिवानंद हेंगणे म्हणाले की प्रयत्नाला विश्वासाची जोड लागली तर यशोशिखर गाठता येते त्या साठी प्रयत्न करत असताना विश्वास संपादन करून त्याची वाटचाल करा यातूनच उज्वल भविष्य घडते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री मधुकरराव मदने व स. शि. मिरजगावे चंद्रकांत या दोघांचाही संस्थेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच कमला नेहरू विद्यालय अहमदपूर व सरस्वती माध्यमिक विद्यालय विळेगाव दोन्ही शाळेच्या वतीने दोन्ही सेवानिवृत्त शिक्षकाचे सपत्नीक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे औचित्य साधुन एक आठवण रहावी म्हणुन स्वखुशीने शाळेतील ग्रंथालयाला 33 ग्रंथ पुस्तके भेट म्हणून दिले तर स. शि. मिरजगावे चंद्रकांत यांनी शाळेला 12 खुर्चींची भेट म्हणून दिली.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आशिष हेंगणे, पाचंगे उमाकांत, पांडुरंग कुंभार , मधूकर जोंधळे यांनी मनोगत व्यक्त केले तर सेवा निवृत्त होणारे शिक्षक मधुकर मदने चंद्रकांत मिरजगावे यांनी आपल्या शाळेविषयी भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमासाठी सलीम सय्यद , मु. अ. भरडे शशिकांत, शैलेंद्र देशमुख माधवराव भोसले इ. प्रतिष्ठीत उपस्थीत होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मधुकर जोंधळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गायकवाड प्रदिप यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक केंद्रे प्रकाश, सौ. सांगवीकर मॅडम, सौ दर्शना हेंगणे, चोबळे सुरेंद्र, पांडुरंग नरवटे, सूर्यवंशी ज्ञानेश्वर, गायकवाड मानसिंग, चवळे रमनप्पा, सूर्यवंशी विजयकुमार, सौ महजन उषा, राहुल मदने, कांबळे मौशी, बने संजय, नागरगोजे पंडीत, मिरजगावे मामा, कपिल किने, चंदेवाड मामा , सतिश हेंगणे इ. चे सहकार्य लाभले.