चाकुर तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
चाकुर ( गोविंद काळे ) : कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ झाला आहे. लसीकरण केल्यावर तीन ते चार महीने रक्तदान करता येणार नाही व जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या पुढाकारातुन चाकुर तहसील कार्यलयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, सध्या कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असुन पहिल्या लाटेपेक्षा आत्ता आलेल्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण कलेले आहे त्यामुळे हा संसर्गजन्य रोगाला रोखण्यासाठी लस हा एकमेव मार्ग असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 मे पासुन 18 ते 44 वयोगटापर्यतच्या सर्व नागरीकांना मोफत लस देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असुन सदरील लस घेतल्यानंतर साधारणतहा : तीन ते चार महीने व्यक्तीला रक्तदान करता येणार नाही यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होईल म्हणुन चाकुर तालुक्याचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी चाकुर तालुक्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते त्या अनुशंगाने तहसीलदार यांच्या पुढाकारातुन तहसील कार्यालयात 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन अहमदपूर -चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व रक्तदात्यांचे या मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल त्यांचे आमदार पाटील यांनी आभार मानले. रक्तदान शिबिरास चाकूर तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असेही यावेळी आवाहन केले आणि रक्तदान या राष्ट्रीय कार्यक्रमात आपण सर्वानी रक्तदान करून सहभाग नोंदवावा अशी विनंती केली. या रक्तदान शिबीरात तब्बल 120 रक्तदात्यांनी रक्तदान केले असुन रक्तसंकलन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था व माऊली ब्लड बँक लातुर यांच्या समुहाने केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे चाकुर तालुक्याचे तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे ,वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिपक लांडे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, नायब तहसीलदार बालाजी चितळे, अनिलराव वाडकर सह विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय विज्ञान संस्था लातुर रक्त पेडी विभागाचे डॉ स्नेहा गंडले,मुसांडे गिरीष, नदिम सय्यद, शाकीर शेख, सुंकलोड, माऊली ब्लड बँकेचे संचालक उमाकांत जाधव व्यवस्थापक डॉ सितम सोनवने रक्त संकलन अधिकारी डॉ.अरफात टाके कर्मचारी संगमेश्वर बरूरे, सुतार मॅडम, स्वाती सोनवने, शिवानी गायकवाड, मयुरी काळे, आदीसह विविध प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.